Horoscope Today In Marathi, 10 May 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.

Live Updates

आजचे राशिभविष्य लाईव्ह १० मे २०२५: जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी...

17:31 (IST) 10 May 2025

पैसाच पैसा! शुक्र करणार केतूच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मीचे सुख, बँक बॅलन्समध्येही होणार वाढ

Shukra Gochar In Ketu Nakshatra: पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र ३१ मे रोजी केतूच्या अश्विनी नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या नक्षत्रात तो १० जूनपर्यंत असेल. ...सविस्तर बातमी
11:51 (IST) 10 May 2025

१३८ दिवस शनि उलट चालत ‘या’ राशींच्या लोकांना देणार प्रचंड श्रीमंती, शनैश्वर महाराजांच्या कृपेने अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Shani Vakri 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, न्याय देवत १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ७ वाजून २४ मिनिटांनी मीन राशीमध्ये वक्री करणार आहे आणि २८ नोव्हेंबर २०२५ रोजी मार्गी होणार आहे. शनि जवळपास १३८ दिवस उलट चाल चालणार आहे. ...सविस्तर बातमी
11:16 (IST) 10 May 2025

२०२७ पर्यंत फक्त शनीचा काळ; 'या' तीन राशींच्या आयुष्यात घेऊन येणार धन, वैभव अन् नुसता पैसा

Shani Meen Gochar 2025: मीन राशीमध्ये प्रवेश केला होता, जो पुढील अडीच वर्ष म्हणजे ३ जून २०२७ पर्यंत या राशीमध्ये राहील. ...अधिक वाचा
10:21 (IST) 10 May 2025

Chanakya Niti : कोणत्या घरांमध्ये पैसा कधीही टिकत नाही? आचार्य चाणक्य काय सांगतात, वाचा

Chanakya Niti : चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये विविध पैलूंविषयी सांगितले. आचार्य चाणक्य सांगतात की काही घरात पैसा टिकत नाही. त्यामागील त्यांनी कारण सुद्धा सांगितले आहे. ...अधिक वाचा
09:21 (IST) 10 May 2025

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

शुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आपल्याला आवडत्या गोष्टी करण्यावर अधिक लक्ष द्यावे. दिवस मनाप्रमाणे घालवावा. जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. गोड बोलून कामे साध्य करावीत.