Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन आणि राशी परिवर्तनाच्या आधारावर १२ राशींच्या ग्रह स्थितीचा अभ्यास केला जातो. ग्रहांच्या ठरविक वेळेनंतर होणाऱ्या या बदलांमुळे अनेक शुभ-अशुभ योग निर्माण होतात, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. याव्यतिरिक्त अंकशास्त्राच्या आधारावरही व्यक्तीचे गुण, स्वभाव याबाबत माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे मेष ते मीनपैकी कोणत्या राशीच्या नशिबात काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

Live Updates

Dainik Rashibhavishya Updates Live :आजचे राशिभविष्य लाईव्ह 0१ सप्टेंबर २०२५

16:49 (IST) 1 Sep 2025

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope 1 September)

घेतलेला निर्णय योग्य ठरेल. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील. भागीदारीतील व्यवसायातून लाभ होईल. धार्मिक आवड वाढीस लागेल. तुमच्या बोलण्याचा घरातील लोकांवर प्रभाव पडेल.

16:25 (IST) 1 Sep 2025

बापरे, बाबा वेंगाची धक्कादायक भविष्यवाणी! सप्टेंबर २०२५ मध्ये देशात मोठं संकट? नेमकं काय घडणार? वाचून जाल हादरून!

Baba Vanga Prediction: बाबा वेंगाचा इशारा खरं ठरणार का? सप्टेंबरमध्ये भारतात मोठं संकट कोसळणार का? सप्टेंबरमध्ये नक्की काय घडणार? जाणून घ्या सविस्तर... ...सविस्तर बातमी
16:10 (IST) 1 Sep 2025

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope 1 September)

मानसिक प्रसन्नता लाभेल. जुन्या मित्रमंडळींशी संवाद होईल. आपल्या वागणुकीने वाहवा मिळवाल. पालकांचा सल्ला मोलाचा ठरेल. आर्थिक लाभाचे योग.

14:41 (IST) 1 Sep 2025

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope 1 September)

आपल्या माणुसकीची इतरांना कल्पना येईल. धडपडया वृत्तीवर संयम ठेवावा. आहारावर नियंत्रण ठेवावे. प्रलंबित कामे पूर्ण करावीत. आजचा दिवस चांगला जाईल.

14:29 (IST) 1 Sep 2025

धनु राशिभविष्य (Sagittarius Horoscope 1 September)

जोडीदाराच्या सद्गुणांनी आनंद मिळेल. कर्ज फेडीचे एक पाऊल पुढे टाकाल. कामाच्या ठिकाणी तुमचा सल्ला मोलाचा ठरेल. तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. आरोग्याची काळजी घ्यावी.

13:38 (IST) 1 Sep 2025

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope 1 September)

कुटुंबात अधिकार प्राप्त होईल. चांगल्या गोष्टीसाठी पैसा खर्च होईल. व्यवसाय वाढीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. महिला सहकार्‍यांची उत्तम साथ मिळेल. नवीन गोष्टी जाणून घेता येतील.

12:28 (IST) 1 Sep 2025

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope 1 September)

आपला दिवस आनंदात जाईल. लहान प्रवासाची शक्यता. मार्गदर्शक व्यक्तींच्या भेटीचा योग. कामातील तांत्रिक बाबी जाणून घ्याल. सर्व गोष्टींची खातरजमा करावी.

12:15 (IST) 1 Sep 2025

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope 1 September)

अधिकाराचा वापर योग्य ठिकाणी करावा. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. आहारावर नियंत्रण ठेवावे. मनातील इच्छा पूर्ण होईल. अन्यथा पोटाचे विकार त्रस्त करू शकतात.

11:48 (IST) 1 Sep 2025

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope 1 September)

डोके शांत ठेवून काम करावे. नेटाने व्यायाम करावा. मन चंचल राहील. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. माणसे ओळखायला शिकावे.

11:29 (IST) 1 Sep 2025

पैसाच पैसा! चंद्रदेव करणार शनीच्या राशी अन् नक्षत्रात प्रवेश, 'या' तीन राशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये मिळणार भरपूर यश

Chandra Gochar 2025: पंचांगानुसार, चंद्र ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करून याचदरम्यान, पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये गोचर करेल. चंद्राचे हे गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल ठरेल. ...अधिक वाचा
11:27 (IST) 1 Sep 2025

Astro Tips: या ३ राशीचे लोक आपल्या स्वभावामुळे जिंकतात प्रत्येकाचे मन; तुमची राशी या यादीत आहे का?

वैदिक ज्योतिषाशास्त्रात एकूण १२ राशींपैकी ३ राशींचे लोक खूप सौम्य आणि चांगल्या स्वभावाचे मानले जातात. पण, प्रत्येक राशीच्या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व वेगळे असते. ...सविस्तर वाचा
10:25 (IST) 1 Sep 2025

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope 1 September)

जोडीदाराच्या मताचा विचार करा. आळसात दिवस ढकलू नका. नवीन ओळखीचा लाभ होईल. भावनिक विचार करू नका. दैनंदिन कामात चिकाटी बाळगा.

09:39 (IST) 1 Sep 2025

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope 1 September)

आवडत्या व्यक्तीची भेट होईल. काही निर्णयासाठी थांबावे लागेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यापारी वर्गाला भागिदारीतून लाभ मिळेल. जोडीदाराचे सक्रिय सहकार्य मिळेल.

09:09 (IST) 1 Sep 2025

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope 1 September)

बोलण्यात खंबीरपणा ठेवावा. तुमच्याबाबत इतरांचा गैरसमज होऊ शकतो. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांचे मत जाणून घ्या. मित्रांची संगत तपासून पहा.

08:53 (IST) 1 Sep 2025

आजपासून संपूर्ण महिना 'या' पाच राशी कमावणार दुप्पट पैसा अन् मानसन्मान; सूर्य-मंगळ अन् 'या' ग्रहांचे गोचर घेऊन येणार सुवर्णकाळ

September Month Graha Gochar 2025: या ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. ...सविस्तर वाचा
07:52 (IST) 1 Sep 2025

मेष राशिभविष्य (Aries Horoscope 1 September)

आपल्या तत्वाला थोडी मुरड घालावी लागेल. जवळचा प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या. अकल्पित घटनांना धिटाईने सामोरे जा. कार्यक्षेत्रात नवीन अधिकार मिळतील. आततायीपणा करून चालणार नाही.

07:51 (IST) 1 Sep 2025

1 September 2025 Horoscope: सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी 'या' राशींना आर्थिक लाभाचा योग! पण माणसे ओळखायला शिका; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य

1 September 2025 Horoscope in Marathi चला तर मग जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यातील पहिला दिवस १२ राशींसाठी नेमका कसा जाणार आहे. ...सविस्तर बातमी

Dainik Rashibhavishya Live Updates

Dainik Rashibhavishya Live Updates