Trigrahi Yog 2025 In Mithun: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र बदल करत असतात, ज्यातून शुभ संयोग आणि राजयोग निर्माण होत असतात, ज्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांच्या जीवनावर पडत असतो. मे महिन्याच्या अखेरीस गुरु मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, तर जूनमध्ये ग्रहांचा राजकुमार बुध आणि ग्रहांचा राजा सूर्यदेखील मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे मिथुन राशीत तीन ग्रहांच्या संयोगाने त्रिग्रही योग तयार होईल. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. तसेच त्यांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशींविषयी.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य, बुध आणि गुरुचा संयोग सकारात्मक ठरू शकतो. या काळात तुमच्या नियोजित योजना यशस्वी होऊ शकतात. तुम्हाला समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुखी राहील. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो, तसेच प्रगती साधता येऊ शकते. इतर व्यवसायात गुंतवणूक करू शकता. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे आणि कौटुंबिक वाद मिटू शकतात.

तुळ

सूर्य, बुध आणि गुरु ग्रहाचा त्रिग्रही योग तुळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. तसेच तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला उत्तम संधी मिळतील आणि पैसे कमविण्याचे नवीन मार्ग खुले होतील. तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायानिमित्त प्रवासाचा योग आहे, विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात यश मिळेल, विशेषतः स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळतील.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी सूर्य, बुध आणि गुरुचा त्रिग्रही योग फायदेशीर ठरू शकतो. या वेळी तुम्हाला भौतिक सुखे मिळू शकतात. तसेच तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. या काळात संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अचानक मोठा नफा होऊ शकतो, यासह सरकारी कामात यश, पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर तुमचे काम किंवा व्यवसाय रिअल इस्टेट, मालमत्ता आणि जमिनीशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुमच्या आईशी तुमचे संबंध चांगले राहतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप – वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे.)