Trigrahi Yog in November: नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रह आपली राशी बदलणार आहेत. तसेच काही ग्रह एकत्र येऊन त्रिग्रही आणि चतुर्ग्रही योग तयार करतील. नोव्हेंबरमध्ये वृश्चिक राशीत त्रिग्रही योग बनणार आहे. हा योग ग्रहांचा सेनापती मंगळ, धनदायक शुक्र आणि ग्रहांचा राजा सूर्य यांच्या एकत्र येण्याने तयार होईल. या योगामुळे काही राशींचे नशीब उजळेल. त्यांना कामधंद्यात प्रगती मिळेल आणि बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते. चला तर मग, पाहूया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
त्रिग्रही योगामुळे वृश्चिक राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा योग तुमच्या राशीच्या लग्न भावात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. तुम्हाला सन्मान, प्रतिष्ठा आणि मान मिळेल. नवीन नोकरी, वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील आणि मनात नवीन उत्साह येईल. जीवनात स्थिरता आणि आदर दोन्ही वाढतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहतील. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.
मकर राशी (Capricorn Horoscope)
हा त्रिग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि लाभ स्थानात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. पैशांची आवक वाढेल आणि धन-संपत्ती वाढण्याचे योग आहेत. कुटुंबीयांकडून मदत मिळेल आणि एखादा अडलेला व्यवहार अचानक पूर्ण होऊ शकतो. गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. तसेच जे लोक शेअर बाजार, सट्टा किंवा लॉटरीमध्ये गुंतवणूक करू इच्छितात, त्यांना देखील नफा मिळण्याची शक्यता आहे.
मीन राशी (Pisces Horoscope)
हा त्रिग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या कुंडलीतील नवव्या स्थानी तयार होईल. त्यामुळे या काळात तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळू शकते. सरकारी अडलेले काम पूर्ण होऊ शकतात. घरात किंवा परिवारात धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. कामधंद्याच्या कारणाने प्रवास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. तसेच तुमच्यासमोर नवे संधी येतील, ज्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
