Rashi Bhavishya In Marathi, 9 May 2025 : ०९ मे २०२५ रोजी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी आहे. या दिवशी उत्तर हस्त नक्षत्र जागृत असेल वज्र योग जुळून येईल, शुक्रवारी अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत असेल. राहुकाल सकाळी १० वाजून ३३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून १० मिनिटांपर्यंत असणार आहे. चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल. आजच्या हस्त नक्षत्रात मेष ते मीन राशींच्या लोकांच्या जीवनात काय बदल घडणार आहे, याबाबत जाणून घेऊ…
९ मे पंचांग व राशिभविष्य (Daily Horoscope in Marathi, 9 May 2025)
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)
अती विचार करू नका. मैत्रीचे संबंध जपावेत. जमिनीच्या कामात लाभ संभवतो. घरात तुमच्या मताला वजन प्राप्त होईल. मानसिक चंचलता जाणवेल.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)
सर्वांशी गोडीने वागाल. कामाचा व्याप लक्षात घ्यावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. सगळ्यांचे लक्षपूर्वक करण्यात दमून जाल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)
कामात चालढकल करू नका. एकाच वेळी अनेक कामे अंगावर येऊन पडतील. वेळेचे महत्व लक्षात घ्या. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. पैशाचा अपव्यय टाळावा.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)
व्यावसायिक वाढीचे नियोजन आखाल. कामातून अपेक्षित लाभ मिळेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. वैवाहिक सौख्य जपावे लागेल. छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)
वैवाहिक सौख्याकडे अधिक लक्ष द्यावे. कामाचा आवाका वाढू शकतो. आळस झटकून टाकावा लागेल. कमिशन मधून मिळणारा फायदा लक्षात घ्यावा. कामाच्या ठिकाणी आपली पत जपावी.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)
जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. आपले संपर्क क्षेत्र वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. वडीलधार्या व्यक्तींचा विरोध होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)
नातेवाईकांशी सलोखा जपता येईल. कामात समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. अती उत्साह दर्शवू नका.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)
मित्रांशी मतभेदाची शक्यता आहे. करमणुकीची साधने शोधाल. प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते. मुलांच्या आनंदात रमून जाल.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathi)
घरगुती वातावरणात दिवस चांगला जाईल. मनाजोगी कामे करण्यात दिवस व्यतीत कराल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. हातातील कामात यश येईल. कचेरीची कामे निघतील.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)
कौटुंबिक सौख्य जपाल. कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या विचारांचा आदर राखला जाईल. बोलतांना कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. शेअर्स, लॉटरी यांचा अती हव्यास नको.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)
धाडसाला वेगळे वळण लागणार नाही याची काळजी घ्या. आततायीपणे वागणे चुकीचे ठरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रवास काळजीपूर्वक करावा. शांतपणे विचार करण्याला प्राधान्य द्या.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)
मनाजोग्या वस्तु खरेदी कराल. भावंडांचे वागणे रूचणार नाही. उगाचच टिप्पणी करायला जाऊ नका. सामोपचाराचे धोरण ठेवा. संपूर्ण विचारांती निर्णय घ्यावा.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर