Vastu Tips For Happy Life : वास्तुशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या काही चुकांमुळे वास्तूदोष निर्माण होतो, त्यामुळे व्यक्तीला आर्थिक आणि करिअरमध्ये अचडणींना तोंड द्यावे लागू शकते. यासाठी घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अनेकदा आपण जाणूनबुजून किंवा नकळत अनेक चुका करतो, ज्याचे परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात. एखाद्या व्यक्तीच्या चुका त्याच्या आर्थिक, व्यवसाय आणि नोकरीच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतात. वास्तुनुसार कोणत्या चुका करू नयेत हे जाणून घ्या.
तुटलेली भांडी
वास्तुशास्त्रानुसार, घरात तुटलेल्या भांड्यात जेवण्याची सवय नकारात्मकता निर्माण करतात. असे म्हटले जाते की, तुटलेली भांडी आणि वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
वाळलेल्या पानांचे तोरण
वास्तुशास्त्रानुसार, वाळलेल्या पानांचे तोरण अनेक दिवस दाराबाहेर तसेच असेल तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असे केल्याने देवी लक्ष्मी घरात राहत नाही, त्यामुळे आर्थिक प्रगतीत अडचणी निर्माण होतात.
लोखंडी खिळे
वास्तुशास्त्रानुसार, घरात गरजेपेक्षा जास्त खिळे लावल्याने आरोग्याशी संबंधित समस्या आणि आर्थिक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.
अस्वच्छता, धूळ
वास्तुशास्त्रानुसार, नियमित साफसफाई करूनही घरात कोळ्याचे जाळे, धूळ, अस्वच्छता आढळल्यास सकारात्मक वातावरण राहत नाही, अशाने चिडचिड होते कोणत्याही कामात अडथळा येतो. करिअरच्या प्रगतीतही अडथळ्यांना तोंड द्यावे लागते.
शौचालयात फोन वापरणे
वास्तुशास्त्रानुसार, शौचालयात मोबाइल फोन घेऊन जाण्याची सवयदेखील अडचणींचे कारण ठरते, यामुळे राहूचा नकारात्मक परिणाम होतो.