वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशेला विशेष महत्त्व आहे. या दोन्ही दिशा थेट आर्थिक समृद्धीशी संबंधित आहेत. तसेच या दोन्ही दिशांना वास्तुदोष असल्यामुळे धन आणि धनाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय घराच्या या दिशांचा चुकीचा वापर केल्यास आर्थिक संकट येऊ शकते. अशा परिस्थितीत घराच्या या दिशांचा योग्य वापर कसा करायचा हे माहीत असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात.

घराच्या उत्तर आणि ईशान्य दिशेला विशेष महत्त्व आहे

उत्तर दिशेचा स्वामी कुबेर आहे, जो धन आणि समृद्धीचा देव आहे. अशा वेळी घराची तिजोरी या दिशेला ठेवावी, कारण असे केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला निळ्या रंगाचा पिरॅमिड ठेवा. या दिशेला निळ्या रंगाचा पिरॅमिड ठेवल्याने संपत्तीचे भांडार कधीच रिकामे होत नाही. शक्य असल्यास, या दिशेने भिंतींचा रंग देखील निळा करा.

काचेचे मोठे भांडे नेहमी उत्तर दिशेला ठेवावे. तसेच त्यात चांदीची नाणी टाकून ठेवावीत. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा कायम राहते.

घराच्या पूर्व-उत्तर दिशेला गणेश आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती ठेवाव्यात. तसेच दिवसातून एकदा येथे दिवा लावावा. याशिवाय या ठिकाणच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासणार नाही.

घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे देखील फायदेशीर ठरते. त्यामुळे घरात आर्थिक सुबत्ता राहते. याशिवाय घराच्या उत्तर दिशेला पाण्याची व्यवस्था ठेवावी.