Vastu tips for house temple: आपल्या घरातील देवघर हे केवळ पूजा करण्याचे स्थान नाही, तर ते संपूर्ण घराच्या सकारात्मक ऊर्जेचे केंद्रबिंदु मानले जाते. म्हणूनच वास्तुशास्त्रात देवघराशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार, जर घराच्या मंदिरात काही विशिष्ट वस्तू ठेवल्या तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते. त्यामुळे मन अशांत राहते. तसंच असं केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि तुमच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो. तेव्हा वास्तुनुसार कोणत्या गोष्टी देवघरात ठेवाव्यात आणि कोणत्या नाही ते जाणऊन घेऊ…
तुटलेली मूर्ती
वास्तुशास्त्रानुसार, जर एखाद्या देवतेच्या मूर्तीचा कोणताही भाग तुटला किंवा तिला तडा गेला तर ती ताबडतोब विसर्जित करावी. घरातील देवघरात तुटलेली मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि पूजा केल्याने त्याचे पूरेपूर फायदेही मिळत नाहीत असे मानले जाते. तुम्ही तुटलेली मूर्ती मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकता. तसंच तुमच्या इच्छेनुसार, ती पवित्र नदीतदेखील विसर्जित करू शकता.
तीक्ष्ण वस्तू
देवघर किंवा मंदिरात शांतता असली पाहिजे. मात्र कधीकधी लोक चुकून तिथे धारदार वस्तू ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार, कात्री, चाकू आणि सुऱ्या यासारख्या धारदार वस्तू घरात संघर्ष आणि तणाव निर्माण करतात. त्यामुळे अशा वस्तू कधीही प्रार्थना कक्षात किंवा देवघराजवळ ठेवू नये.
एकापेक्षा जास्त शंख
शंख हा देवी लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो आणि त्याचे पूजेत विशेष महत्त्व आहे. शंखाचा आवाज वातावरण शुद्ध करतो आणि सकारात्मक ऊर्जा पसरवतो असे मानले जाते. असं असताना देवघरात एकापेक्षा जास्त शंख ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचण्यात अडथळा येऊ शकतो असे वास्तुशास्त्रानुसार मानले जाते. त्यामुळे देवघरात फक्त एकच शंख ठेवा आणि तो नियमितपणे स्वच्छ करा.
घाणेरडे कापड किंवा झाडू
बरेचदा लोक स्वच्छता करताना देवघराजवळ कपडे किंवा झाडू सोडतात. मात्र, तुम्ही हे टाळले पाहिजे. देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे, कारण तिथे देव-देवतांचे निवासस्थान आहे असे मानले जाते. तिथे घाणेरडे कपडे सोडल्याने देव क्रोधित होऊन घरात अशांतता पसरू शकते असे मानले जाते.
काडीपेटी आणि जळलेले तीळ
वास्तुशास्त्रानुसार, काडीपेटीच्या काड्या किंवा जळलेले तीळ नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि म्हणूनच त्यांना नेहमी देवघरापासून दूर ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देतात.