What is meaning of Vasu Baras: हिंदू धर्मामध्ये गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. गाईला गोमाता म्हणजेच आई समजून तिचा सेवा केली जाते. असं म्हणतात की, गाईमध्ये ३३ कोटी देवता वास करतात. दिवाळीची खरी सुरुवात गाईची पूजा करून म्हणजेच वसुबारस या सणापासून होते. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गोवत्स द्वादशीला हा सण साजरा केला जातो. यंदा २८ ऑक्टोबर रोजी (आज) वसुबारस साजरा केला जाईल.

वसुबारस शब्दाचा अर्थ काय?

हिंदू पंचांगानुसार वसुबारस हा सण अश्विन पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केला जातो. या दिवशी घरोघरी गाईची आणि वासराची पूजा केली जाते. वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस. त्यामुळे या दिवसाला वसुबारस, असं म्हटलं जातं. हा सण महाराष्ट्रासह भारतातील इतर काही राज्यांमध्येही साजरा केला जातो. या दिवशी घरातील विवाहित स्त्रिया कुटुंबाच्या आणि मुलांच्या कल्याणासाठी गाईची पूजा करतात. तिला नैवेद्य खाऊ घालतात. परंतु, हल्ली शहरात गाईच्या मूर्तीची पूजा केली जाते.

वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त

वसुबारस तिथीची सुरुवात : सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपासून

वसुबारस तिथी समाप्त : मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजून ०४ मिनिटांपर्यंत असेल.

वसुबारसची पूजा कशी करावी?

  • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • स्वच्छ वस्त्र परिधान करून घराबाहेर गोपद्म रांगोळी काढावी.
  • तुमच्या घरी गाई आणि वासरू असेल, तर त्यांची पूजा करावी. परंतु, जर तुम्ही शहरी भागात राहत असाल, तर गाई आणि तिच्या वासराच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी.
  • गाईला निरांजनाने ओवाळून गाईला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालावा.

हेही वाचा: Narak Chaturdashi 2024 : ३० की ३१ कधी साजरी केली जाईल नरक चतुर्दशी? यमदीपदान अन् अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त नेमका कधी?

दरम्यान, पौराणिक मान्यतेनुसार समुद्रमंथनातून ज्यावेळी १४ रत्ने बाहेर पडली, त्यातून कामधेनूचीही उत्पत्ती झाली. त्यामुळेच गाईला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. गाईची सेवा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.