Vat Purnima 2023: वटपौर्णिमा हा नवरा-बायकोच्या पवित्र नात्याचा खूप मोठा सण आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी विवाहित महिला आपल्या पती किंवा नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. याच पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने वटवृक्षाच्या खाली सत्यवानाचे प्राण परत आणले होते. या दिवसाची आठवण म्हणून विवाहित महिला पतीला भरपूर आयुष्य लाभावे, यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का या वर्षी वटपौर्णिमा केव्हा आहे? आज आपण वटपौर्णिमेचे महत्त्व आणि शुभ मुहूर्ताविषयी जाणून घेणार आहोत.

या वर्षी वटपौर्णिमा केव्हा आहे?

देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या दिवशी आणि मुहूर्तावर वटपौर्णिमा साजरी केली जाते. काही ठिकाणी वटपौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावास्येला साजरी केली जाते तर काही ठिकाणी पौर्णिमेला साजरी केली जाते. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये या वर्षी वट पौर्णिमा ही ३ जूनला साजरी केली जाणार आहे.

pink moon 2024
गुलाबी साडीचा विषय सोडा, आकाशात दिसणार चक्क ‘गुलाबी चंद्र’; आज पौर्णिमेला ‘या’ वेळेत पाहा ‘पिंक मून’
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई

(हे ही वाचा: Chandra Grahan 2023 : वर्षातील दुसरं चंद्रग्रहण केव्हा आहे माहित्येय का? जाणून घ्या वेळ आणि भारतात ते दिसणार का?)

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सकाळी ११ वाजता सुरू होणार तर दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून दहा मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे. या शुभ मुहूर्तादरम्यान तुम्ही वटवृक्षाची पूजा करू शकता.

वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व

वटपौर्णिमा व्रत हे विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. अविवाहित मुलीसुद्धा चांगला पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेचे व्रत करतात. हे व्रत केल्याने वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी नांदते. पतीचं आयुष्य वाढतं. पती संकटातून मुक्त होतो. एवढंच काय तर संतानप्राप्तीसाठीही अनेक महिला वटवृक्षाची पूजा करतात.