साडे तीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा. हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला येतो. या दिवसापासून हिंदू नववर्षांची सुरुवात होते. यावर्षी २ एप्रिल २०२२, (शनिवार) या दिवसापासून नवरात्रीची सुरुवात होईल. प्रत्येक हिंदू नववर्षाला स्वतःचा राजा, मंत्री आणि मंत्रिमंडळ असते. या वेळी हिंदू नववर्ष संवत २०७९ अशाच दुर्मिळ योगायोगाने सुरू होत आहे, जे दीड हजार वर्षांत घडते. या नववर्षात नऊही ग्रह राशी बदल करणार आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार हे वर्ष महत्त्वाचं आहे. नक्षत्रांची स्थिती देखील अत्यंत दुर्मिळ आहे. यापूर्वी असा दुर्मिळ योग २२ मार्च ४५९ रोजी तयार झाला होता.

एप्रिल महिन्यात प्रथम ग्रहांचा सेनापती मंगळ ७ एप्रिल रोजी शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. यानंतर, व्यवसाय आणि बुद्धिमत्ता देणारा बुध ग्रह ८ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करेल. १३ एप्रिल रोजी देवांचा गुरू बृहस्पती गुरू मीन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. त्यानंतर धन आणि वैभव देणारा शुक्र २७ एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करेल. १२ एप्रिल रोजी मायावी ग्रह राहू मेष राशीत प्रवेश करेल. तर १२ एप्रिललाच केतू ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल. यानंतर २९ एप्रिल रोजी ग्रहांचे न्यायाधीश शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करतील. तसेच, चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी आपली राशी बदलणार आहे. अशा प्रकारे एप्रिलमध्ये ९ ग्रह राशी बदलतील. तीन राशीच्या लोकांना या नवग्रहांच्या संक्रमणाचा विशेष लाभ होऊ शकतो.नवीन वर्षाच्या सुरुवातीला रेवती नक्षत्र आणि तीन राजयोग तयार होत आहेत. याशिवाय, नवीन वर्षाच्या सुरुवातीला मंगळ त्याच्या उच्च राशीत असलेल्या मकर राशीत, राहू-केतू देखील त्याच्या उच्च राशीत (वृषभ आणि वृश्चिक) असतील. दुसरीकडे, शनी स्वतःच्या राशीत मकर राशीत आहे. या कारणास्तव हिंदू नववर्षाच्या कुंडलीत शनि-मंगळाचा शुभ संयोग तयार होत आहे.

Grah Transit 2022: एप्रिलमध्ये नऊ ग्रह करणार राशी बदल, ‘या’ राशींसाठी धनलाभाचा योग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिथुन, तूळ आणि धनु राशीच्या लोकांना हिंदू नववर्षानिमित्त दुर्मिळ योगाचा लाभ मिळू शकतो. हा योग या लोकांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखवले. काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. गुंतवणुकीत अपेक्षित यश मिळेल. दुसरीकडे, देशाबद्दल बोलायचे झाले तर या वर्षी लोकांच्या कल्याणासाठी योजना तयार केल्या जातील आणि त्यावर काम केले जाईल. अनेक लोकांसाठी हे वर्ष आयुष्यात मोठ्या बदलांचे वर्ष ठरू शकते.