scorecardresearch

Premium

‘या’ राशी पुढील आठवड्यात होणार मालामाल? तुमची रास यात आहे का?

ज्योतिषशास्त्रानुसार पुढील आठवड्यात काही राशी मालामाल होऊ शकतात. त्या चार राशी कोणत्या? आज आपण जाणून घेऊ या.

Weekly Horoscope Astrology
(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ज्‍योतिषशास्त्रानुसार राशींमधील ग्रह हे मानवी आयुष्यावर परिणाम करत असतात. राशींमधील ग्रह शुभ-अशुभ फळे देतात असे मानले जाते. ज्‍योतिषशास्त्रानुसार पुढील आठवड्यात चार राशींना शुभ फळ मिळण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या शेवटी धनसंपत्तीचे कारक असणारा शुक्र ग्रह गोचर किंवा मार्गक्रमण करणार आहे. या दरम्यान मंगळ ग्रह हा कर्क राशीत प्रवेश करणार आहे तर शनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीला ग्रहांच्या स्थितीचा या राशींवर थेट सकारात्मक प्रभाव पडू शकतो असे मानले जाते. असे म्हणतात की, या काळात काही राशी मालामाल होऊ शकतात. त्या चार राशी कोणत्या? आज आपण जाणून घेऊ या.

१. मेष

ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ फळ देणारा आहे. या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे आणि त्यांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, असे मानले जाते. असे म्हणतात की, व्यवसाय करणाऱ्यांना नफा होण्याची शक्यता आहे.

Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १२ महिन्यानंतर गुरू राशीमध्ये प्रवेश करणार सूर्यदेव, ‘या’ राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ
How Long Men & Women Shall Exercise in A week to Reduce Threat Of Death by 24 Percent New Study US Suggest How To Live Long
महिलांनी आठवड्यातून केवळ ‘इतकी’ मिनिटे व्यायाम केल्यास मृत्यूचा धोका होतो २४ टक्के कमी; तर पुरुषांना..
Rahu Gochar 2024
Rahu Gochar 2024 : राहू गोचरमुळे या राशी होतील मालामाल, मिळणार गडगंज पैसा; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते…
WHAT IS POST-VIRAL BRONCHITIS
विषाणुजन्य तापाच्या संसर्गातून बरे होऊनही तुमचा खोकला जात नाही का? जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर

२. वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांची सर्व कामे या आठवड्यात मार्गी लागतील आणि कामे मार्गी लागल्याने ते आनंदी राहतील. नोकरी करणाऱ्यांचे प्रमोशन होऊ शकते आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे असे मानले जाते.

हेही वाचा : सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश घेत ‘या’ ५ राशींच्या भाग्याला देईल झळाळी? ‘या’ रूपात लक्ष्मी बनवू शकते लखपती

३. मिथुन

ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य या आठवड्यात उजळणार आहे आणि त्यांच्या कामाला वेग येईल. या राशीच्या लोकांना आर्थिक संकटातून सुटका मिळू शकते आणि त्यांना धनलाभ होऊ शकतो असे मानले जाते. असे म्हणतात की, व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा फायदेशीर असणार आहे.

४. धनु

धनु राशीच्या लोकांना मे महिन्याचा शेवटी आणि जूनच्या सुरुवातीला फायदा होणार असे मानले जाते. असे म्हणतात की, त्यांची आर्थिक बाजू भक्कम होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीची व्यक्ती नवे घर किंवा गाडी खरेदी करू शकेल. व्यवसाय करणाऱ्यांना नफा होऊ शकतो आणि नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होऊ शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Weekly horoscope astrology these four zodiac signs will earn money read saptahik rashifal ndj

First published on: 26-05-2023 at 17:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×