Weekly Numerology Prediction 3 To 9 November 2025  : या आठवड्यात ग्रहांची अनोखी जुगलबंदी दिसणार आहे. शुक्र, गुरु, सूर्य, मंगळ आणि शनि एकत्र प्रभाव टाकत आहेत आणि त्यामुळे हंस, रूचक, मालव्य आणि विपरीत राजयोग तयार होत आहेत. या आठवड्यात १ ते ९ मूलांकांपैकी अनेकांना भाग्याची साथ लाभणार आहे. काहींसाठी हा आठवडा आर्थिक वाढ, तर काहींसाठी नातेसंबंध आणि आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक संकेत देतो. पाहूया तुमचा मूलांक काय सांगतो…

मूलांक १ (१, १०, १९, २८ जन्मतारीख)

हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. काही आठवड्यांपासून अडचणीत असलेले विषय सुटण्याची शक्यता आहे. वित्तीय क्षेत्रात उल्लेखनीय वाढ होईल आणि जुने गुंतवणुकीचे फायदे दिसतील. कुटुंबातील सदस्यांशी नाते अधिक घट्ट होईल. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाचं यशस्वी फळ मिळू शकतं.

मूलांक २ (२, ११, २०, २९ जन्मतारीख)

या आठवड्यात थोडं असुरक्षित वाटू शकतं, पण तुम्ही संकटांना निर्धाराने सामोरं जाल. आठवड्याच्या शेवटी थोडं अधीर होऊ शकता, त्यामुळे संयम राखा. कुटुंबासोबत वेळ घालवणं तुम्हाला शांतता देईल.

मूलांक ३ (३, १२, २१, ३० जन्मतारीख)

व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात चढ-उतार राहतील. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल, पण कामाचा ताण वाढू शकतो. एखाद्या स्त्री परिचिताकडून आर्थिक लाभ मिळू शकतो. गैरसमज टाळण्यासाठी संवाद वाढवा.

मूलांक ४ (४, १३, २२, ३१ जन्मतारीख)

या आठवड्यात तुम्ही सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. मित्रांमध्ये तुमचं हसतमुख आणि विनोदी व्यक्तिमत्व चर्चेत राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा बजेट ढासळू शकतं. प्रवासाचे योग निर्माण होत आहेत.

मूलांक ५ (५, १४, २३ जन्मतारीख)

तुमचं मन अध्यात्माकडे झुकलेलं असेल. तीर्थयात्रा किंवा दानधर्माची इच्छा निर्माण होईल. शासनाशी संबंधित काही जुने अडथळे या आठवड्यात दूर होण्याची शक्यता आहे. निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा.

मूलांक ६ (६, १५, २४ जन्मतारीख)

थकवा आणि आळस यांचा त्रास संपेल. शारीरिकदृष्ट्या स्फूर्ती येईल. कौटुंबिक विषयांवर लक्ष देण्याची गरज आहे. छोटासा प्रवास किंवा outing तुमचं मन प्रसन्न करेल. कामकाज स्थिर राहील.

मूलांक ७ (७, १६, २५ जन्मतारीख)

या आठवड्यात एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मौल्यवान सल्ला मिळू शकतो जो आयुष्यात बदल घडवेल. बदलांना घाबरू नका, तेच प्रगतीचं कारण ठरतील. तज्ञांकडून मार्गदर्शन घ्या आणि संयम ठेवा.

मूलांक८ (८, १७, २६ जन्मतारीख)

कोणतंही मोठं सौदा तातडीने करू नका. थोडं थांबा आणि निरीक्षण करा. अडकलेला पैसा परत मिळण्याचे योग आहेत. परदेश प्रवासाचे संकेत मिळत आहेत. मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ञ सल्ला घ्या.

मूलांक ९ (९, १८, २७ जन्मतारीख)

हा आठवडा लोकप्रियतेचा आहे. मित्रमंडळी आणि कुटुंबात तुम्ही लक्षवेधी ठराल. एखाद्या मित्राला तुमच्या मदतीची गरज पडू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, थोडा ताण जाणवू शकतो.

या आठवड्याचा विशेष योग

मालव्य राजयोगामुळे मूलांक १, ३, ५, ६, ७, ८ आणि ९ यांच्या आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात वाढ होणार आहे. काहींसाठी हा काळ “भाग्य खुलण्याचा” ठरेल.