Diwali Related Baby Girl : दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच काल २० ऑक्टोबर २०२५ रोजी नरक चतुर्दशीला ठिकठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जर खास दिवशी तुमच्या घरी मुलगी जन्माला आली तर समजून घ्या की तुमच्या घरी स्वतः देवी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. मग याचनिमित्त लक्ष्मी स्वरूप तुम्ही तुमच्या मुलीसाठी असे नाव निवडले पाहिजे जे ज्याचा अर्थही सुंदर असेल. शिवाय, दिवाळीला जन्माला आल्याने, हे नाव देवी लक्ष्मी किंवा दिवाळीशी देखील जुळून आले पाहिजे.
दिवाळीला जन्मलेल्या मुलींसाठी काही सुंदर नावे पुढीलप्रमाणे…
- दीपाली – दिव्यांनी सजवलेली, तेजस्वी
- लक्ष्मी – संपत्ती आणि सौभाग्याची देवी
- आर्य – आदरणीय आणि सुसंस्कृत
- कियारा – तेजस्वी, पवित्र
- प्रदीप्ती – प्रकाश पसरवणारी
- आद्या – सृष्टीची पहिली शक्ती, दुर्गेचे रूप
- रोशनी – प्रकाश, देवत्वाचे प्रतीक
- तनिष्का – सोन्यासारखी शुद्ध आणि सुंदर
- आदित्री – देवी लक्ष्मीला आदित्री असेही म्हणतात, ज्याचा अर्थ ‘अत्यंत आदरणीय’ असा होतो. तुमच्या मुलीसाठी हे एक सुंदर नाव आहे.
- देवश्री – तुम्ही तुमच्या मुलीचे नाव देवश्री ठेवू शकता, कारण देवी लक्ष्मीला देवश्री असेही म्हणतात.
- कृती – तुम्ही तुमच्या मुलीचे नाव कृती ठेवू शकता, ज्याचा अर्थ ‘सिद्ध केलेली गोष्ट’, पूर्ण’ असा होतो.
- आदि लक्ष्मी – आदिशक्ती.
- धन लक्ष्मी – संपत्तीची, धान्याची देवी.
- गज लक्ष्मी – पशुधनाची देवी.
- संत लक्ष्मी – मुलांची देवी.
- वीर लक्ष्मी – धैर्य किंवा शौर्याची देवी.
- विजया लक्ष्मी – विजय किंवा विजयाची देवी.
- विद्या लक्ष्मी – म्हणजे ज्ञान आणि शिक्षणाची देवी.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)