Zodiac signs of angry women: ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मतारीख, वेळ व ठिकाण या गोष्टींचा अभ्यास करून प्रत्येक व्यक्तीची कुंडली काढली जाते. त्याव्यतिरिक्त १२ राशी, २७ नक्षत्रे, मूलांक, भाग्यांक, जन्म वार, जन्म महिना यांच्यावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण, अवगुणांबद्दल भाष्य केले जाते. दरम्यान, आज आपण १२ राशींतील अशा काही महिलांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे आपल्या सासूबरोबर कधीही पटत नाही. या मुली सासूलाच धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे अनेकदा कुटुंबात वाद होतात. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊ

‘या’ राशीच्या महिलांचे सासूबरोबर कधीही पटत नाही

मेष

मेष या राशीचा स्वामी मंगळ ग्रह असून मंगळ हा ग्रह साहस, ऊर्जेचा कारक ग्रह आहे, त्यामुळे मंगळाचे काही गुण या राशीच्या लोकांमध्येही पाहायला मिळतात. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या महिलांचे आपल्या सासूबरोबर कधीही फारसे पटत नाही, कारण या महिलांना सतत चिडचिड करायची सवय असते. शिवाय यांना रागही खूप लवकर येतो, रागात या कोणालाही काहीही बोलू शकतात. त्यांच्या अशा स्वभावामुळे घरातील सासू, नणंदबरोबर त्यांचे फारसे पटत नाही.

वृश्चिक

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असून मंगळाच्या प्रभावाने या राशीच्या व्यक्तीदेखील साहसी, निर्भीड आणि आत्मविश्वासू असतात. परंतु, त्यांच्यातील हे गुण कधी कधी त्यांच्यासाठी घातक ठरू शकतात. या राशीच्या महिला अनेकदा आपल्या सासूलाच मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे कुटुंबात वादाचे फटाके फुटतात. शिवाय या महिलांमध्ये सहनशक्तीची कमतरता असते.

सिंह

सिंह राशीचा स्वामी सूर्य ग्रह असून सूर्याच्या प्रभावाने या राशीच्या व्यक्तीदेखील ऊर्जावान, हुशार आणि आत्मविश्वासू असतात. परंतु, त्यांना त्यांच्या या गुणांचा अभिमान असतो. आपण सर्वात श्रेष्ठ आहोत असा या महिलांचा समज असतो, त्यामुळे या महिलांचे त्यांच्या सासूबरोबर अजिबात पटत नाही.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)