Venus-pluto Square: ज्योतिषशास्त्रात, शुक्राला राक्षसांचा गुरु तसेच प्रेम-आकर्षण, संपत्ती, वैभव इत्यादींचा कारक ग्रह मानला जातो. शुक्रीच्या स्थितीत थोडासा बदल निश्चितच १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करतो. पंचांगानुसार, ८ नोव्हेंबर रोजी रात्री ०२ वाजून ११ मिनिटांनी शुक्र आणि यम एकमेकांपासून ९० अंशांवर असतील, ज्यामुळे समकोण योग तयार होत आहे. अशा परिस्थितीत, काही राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश तसेच आर्थिक लाभ मिळू शकतो.

शुक्र-यमाचा समकोण योग करणार मालामाल

वृषभ

या राशीच्या लोकांसाठी शुक्र-यमाचा समकोण योग अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या लोकांना लांबचा प्रवास करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत, परदेश दौऱ्याचीही शक्यता असू शकते. लग्नाचे स्थळ येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या पालकांकडून, शिक्षकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकाल. तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असेल. यामुळे तुम्ही अधिक दानधर्म कराल. आत्मविश्वास वेगाने वाढेल. याचसह, तुमचा भाऊ-बहिणींबरोबर चांगला वेळ जाईल.

कन्या

या राशीच्या व्यक्तीं साठी समकोण योग खूप फायदेशीर ठरू शकतो. शुक्रच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते. भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. तुम्हाला व्यापारासाठी गुंतवणूकदार देखील मिळू शकतो. अविवाहित लोकांना जोडीदार मिळू शकतो. त्यासोबत लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. मित्रांबरोबर चांगला वेळ घालवला जाईल. अविवाहित लोक लग्नाचा प्रस्ताव देऊ शकतात. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल आणि तुम्ही स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित कराल.

धनु

या राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि यमाचा समकोण योग अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या लोकांसाठी घरात आनंदाचे दार वाहू शकते. याचसह घरात कोणीतरी येणार आणि जाणार. तुम्ही नवीन घर, वाहन खरेदी करू शकता किंवा घराचे नूतनीकरण करण्याचा विचार करू शकता. तुम्हाला परदेशातून लाभ मिळू शकतो. जोडीदाराबरोबर नाते अधिक दृढ होईल.

कुंभ

या राशीच्या लोकांसाठी, शुक्र-यमाचा समकोण योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांच्या दारावर आनंद ठोठावू शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या कामाच्या पूर्ततेसह, संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते. तुम्हाला पैसे कमविण्याची उत्तम संधी मिळू शकते. समाजात आदर आणि सन्मान झपाट्याने वाढणार आहे. याच शिक्षण क्षेत्रातही बरेच फायदे मिळणार आहेत. तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंद मिळू शकेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)