शेतकऱ्यांना अंधारात ठेवून समृद्ध महामार्गासाठी सुरू केलेली भूसंपादनाची प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. या महामार्गाच्या संपादनाच्या हरकतीसाठी एक महिन्याची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

मुंबई ते नागपूर या ७१० किलोमीटरच्या महामार्गासाठी भूसंपादन केले जात आहे. जुन्या रस्त्यांचे चार व सहापदरी रूपांतर केल्यास अधिक जमीन लागणार नाही. मात्र, नवीन योजना तयार करून केले जाणारे संपादन चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. औरंगाबाद जालना जिल्हय़ातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असून, शेतकऱ्यांना अंधारात ठेवून मार्किंग केले जात आहे. हरकती घेण्यासाठी २ जानेवारीपर्यंतची मुदत २ फेब्रुवारीपर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मोर्चात माजी आमदार कल्याण काळे, सुभाष लोमटे, कल्याण डुगले, नानासाहेब पळसकर आदी सहभागी झाले होते.