News Flash

माथाडी कामगारांचे उपोषण पगाराच्या निर्णयानंतर मागे

वैजापूरच्या शासकीय गोदामातील माथाडी कामगारांचा थकित पगार माथाडी मंडळात जमा करण्याचा निर्णय तहसीलदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेतल्यानंतरच माथाडी कामगारांनी मंगळवारपासून सुरू केलेले सहकुटुंब बेमुदत उपोषण

वैजापूरच्या शासकीय गोदामातील माथाडी कामगारांचा थकित पगार माथाडी मंडळात जमा करण्याचा निर्णय तहसीलदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेतल्यानंतरच माथाडी कामगारांनी मंगळवारपासून सुरू केलेले सहकुटुंब बेमुदत उपोषण मागे घेतले. मराठवाडा लेबर युनियनतर्फे हे उपोषण करण्यात आले.

माथाडी कायद्यानुसार राजकीय गोदामातील माथाडी कामगारांसह सर्वाचा पगार व लेव्ही दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत माथाडी मंडळात भरणे बंधनकारक असताना शासकीय गोदामांचे कंत्राटदार पगाराचे वाटप रोखीने करत होते.
रोखीने पगाराचे वाटप करणे हे माथाडी कायद्याचे उल्लंघन असल्याने माथाडी मंडळाने रोखीने पगार घेता कामा नये, असे वैजापूर शासकीय गोदामातील माथाडी कामगारांना सांगितल्यावर त्यांचा दोन महिन्याचा पगार थकला होता, म्हणून बेमुदत उपोषण करावे लागल्याचे मराठवाडा लेबर युनियनचे चिटणीस देवीदास कीर्तीशाह यांनी सांगितले. तहसीलदार डॉ. पडघम यांनी हमाल-कष्टकऱ्यांचे नेते सुभाष लोमटे व कंत्राटदाराची बैठक घेतल्यानंतर माथाडी कामगारांचा पगार व लेव्ही माथाडी मंडळात भरण्यासंबंधी निर्णय झाला व उपोषण मागे घेण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 12:56 am

Web Title: construction workers stop hunger strike
टॅग : Hunger Strike
Next Stories
1 औरंगाबाद-पैठण रस्त्याची दुरुस्ती तातडीने करा
2 मुख्य अभियंत्यास कार्यकारी संचालकांकडून समज
3 लातूरसाठी जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावाची शिफारस
Just Now!
X