News Flash

उपजिल्हाधिकारी घाडगे यांची आत्महत्या

आजाराला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

औरंगाबाद : भूसंपादन विभागातील उपजिल्हाधिकारी दीपक रामराव घाडगे यांनी बुधवारी रात्री उशिरा सातारा परिसरातील ऊर्जानगरातील घरात गळफास लावून आत्महत्या केली. उपजिल्हाधिकारी दीपक घाडगे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आजाराला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून दीपक घाडगे हे कार्यरत होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांना सुटी न मिळाल्याने आजारपण सांभाळत आपले कर्तव्य बजावले होते.

बुधवारी मध्यरात्री ते घरी असताना त्यांना कुटुंबातील सदस्यांनी आवाज दिला. परंतु खोलीतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, दीपक घाडगे यांनी गळफास घेतला असल्याचे दिसून आले. त्यांना तत्काळ उपचारासाठी घाटीत दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्य़ातील केज येथे घाडगे यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 6:55 am

Web Title: deputy collector deepak ramrao ghadge commit suicide zws 70
Next Stories
1 औरंगाबादेत ठेकेदाराचा खून
2 औरंगाबादमध्ये तरुणाचा भोसकून खून
3 हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान, पण टंचाईपासून दिलासा
Just Now!
X