News Flash

गोव्याच्या लोकायुक्तपदी न्या. जोशी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव परिमल राय आदींची उपस्थिती होती.

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी यांची गोवा लोकायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र-गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ७ मे रोजी दोनापावल येथील राजभवनात न्या. जोशी यांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव परिमल राय आदींची उपस्थिती होती.

निवृत्त न्या. अंबादास जोशी यांनी महाराष्ट्र न्यायाधिकरण प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आठ वर्षे न्यायदानाच्या प्रक्रियेत काम केलेले आहे. न्या. जोशी यांचे शिक्षण अंबाजोगाई येथे तर कायद्याच्या पदवीपर्यंतचे शिक्षण लातूर येथे झालेले आहे. औरंगाबाद येथील न्यायालयात त्यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली.

देवगिरी बँकेचे दहा वर्षे संचालक तर चार वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मुंबई, औरंगाबाद व गोवा येथे त्यांनी प्रतिनियुक्तीने न्यायदान प्रक्रियेचे काम केलेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 12:19 am

Web Title: justice joshi as the lokayukta of goa akp 94
Next Stories
1 औरंगाबादमध्ये निर्बंधांमुळे ऑटो उत्पादन घसरणीला
2 महात्मा फुले योजनेचा लाभ केवळ ९ हजार रुग्णांनाच
3 शेण-भुश्यापासून दररोज दोन क्विंटल लाकूड
Just Now!
X