‘लोकसत्ता लोकांकिका’च्या औरंगाबाद विभागीय अंतिम फेरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगीत विभागाची ‘पाझर’ ही एकांकिका अव्वल ठरली. सवरेत्कृष्ट दिग्दर्शक आणि सवरेत्कृष्ट लेखनाचे पहिले पारितोषिकही याच एकांकिकेने मिळविले.

राजस्तरीय महाविद्यालयीन स्पध्रेच्या विभागीय अंतिम फेरीला शहरातील तापडिया नाटय़मंदिरात दुपारी सुरुवात झाली. परीक्षक सुधीर मुंगी आणि शेखर ढवळीकर यांच्या हस्ते नटराजाचे पूजन करून स्पध्रेला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक संघाने आपले सादरीकरण  केले. शनिवारी ‘हय़ो रं हय़ो खेळ’, ‘भोंगे’, पाझर’, ‘आम्ही दोघे’ आणि ‘खडकेवाडी’ या पाच एकांकिका सादर झाल्या. यामध्ये ‘पाझर’ही एकांकिका उपस्थितांना भावली. परीक्षकांनीही तिच्या सादरीकरणाला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक दिले. राजर्षी शाहू महाविद्यालयाची ‘हय़ो रं हय़ो खेळ’ ही एकांकिका द्वितीय, तर तृतीय पारितोषिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागच्या ‘भोंगे’ एकांकिकेला मिळाले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. परीक्षक शेखर ढवळीकर यांनी, सादर झालेल्या सर्व नाटकांच्या विषय आणि आशयांमध्ये जिवंतपणा होता, असे सांगितले.

  • ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी’, पुणे व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा होत असून ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे स्पर्धेचे टॅलेण्ट पार्टनर आहेत. ‘अस्तित्व’ या संस्थेच्या सहकार्याने होत असलेल्या या स्पर्धेच्या पारितोषिकांपोटी यंदा साडेतीन लाख रुपयांची बक्षिसे घोषित करण्यात आली आहेत.

   विभागीय अंतिम फेरीतील यशाचे मानकरी

  • सवरेत्कृष्ट एकांकिका- पाझर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संगीत विभाग
  • सवरेत्कृष्ट एकांकिका द्वितीय- हय़ो रं हय़ो खेळ- राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर</li>
  • सवरेत्कृष्ट एकांकिका तृतीय- भोंगे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नृत्य विभाग
  • सवरेत्कृष्ट दिग्दर्शन व लेखन ( दोन स्वतंत्र पुरस्कार)- प्रवीण पाटेकर- पाझर
  • अभिनय- शुभम खरे (पाझर), गणेश देवकर (हय़ो रं हय़ो खेळ)
  • प्रकाशयोजना- चेतन ढवळे, (पाझर)
  • नेपथ्यकार – अश्विनी पवार, (हय़ो रं हय़ो खेळ)
  • संगीत – वैभव माने, (हय़ो रं हय़ो खेळ)