एखाद्याला गंडवल्या नंतर सिम, मोबाईल आणि घर हातोहात बदलून नवरा व मुलाचा सांभाळ करणार्‍या लेडी नटवरलालने औरंगाबादेतील एका व्यापार्‍याला १लाख २०हजारांचा गंडा घातला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञानेश सालगूडे(४०) रा. देशमुखनगर गारखेडा यांना अन्विता निळकंठ या महिलेने १लाख २० हजारांना चुना लावला.

अन्विता निळकंठ(३६) रा. औंध असे या महिलेचे नाव असून पुण्यात ती रेकाॅर्डवरची गुन्हेगार आहे.फरार झाल्यानंतर जवळपास ती दोन वर्ष पोलिसांच्या हाती लागंत नसे व दोन वर्षानंतर पुन्हा पोलिस निरीक्षकांची बदली झाली की, दुसर्‍याला फसवंत असे. तिला या पूर्वी फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक केलेले पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी तिला अटक केली होती. २०१५साली पुण्यात नागरिकांना महापालिकेतील टीडीआर चा लाभ मिळवून देण्याकरता लाखो रु ना काही नागरिकांना फसवले होते. तिची मोडस ऑपरेंडी लक्षात घेऊन तिच्या भावा मार्फत तिला सांगवीतून नवले यांनी अटक केली होती.

या प्रकरणी पुण्याच्या चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.अशी माहाती सध्याचे पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रऊफ शेख यांनी सांगितले.सध्या पोलिस निरीक्षक नवले औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आहे.सालगुडे यांची पिशोर करंजखेड येथे गोशाळा आहे. गायीचे दुध, शेण आणि गोमुत्रा पासुन पदार्थ तयार करुन ते विक्री करतात जानेवारी २०१८ला नाशिक डोंगरीवस्ती येथे सालगुडे यांचा धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी स्टाॅल लागला होता. त्यावेळी अन्विता ने त्यांच्या सोबत ओळख करवून घेत २० हजार रु.च्या काही वस्तू रोखीत खरेदी केल्या सालगुडे यांना पूर्ण विश्वासात घेऊन एवढे चांगले आयटम तुम्ही राज्यातल्या प्रत्येक रेल्वेस्टेशन वर स्टॉल लावून विका चांदी होईल असा सल्ला दिला.त्यानंतर सालगुडेंनी तिला मार्गदर्शन करण्याची विनंती केली.

त्यावेळी तिने दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यालयात टेंडर काढण्पासाठी १लाख २० हजार रु.द्या लगेच काम सुरु होईल असे सांगितले. त्यानंतर सालगुडेंकडून पैशे घेत अन्विता ने काही महिने संवादच बंद केला.सालगुडेंनी पैशे वापस मागण्याचा तगादा लावल्या आयसीआयसीआय बॅंक औंध आणि शिवाजी नगर येथील आयडीबीआय बॅंकेचे चेक दिले ते दोन्ही चेक बाऊन्स झाल्यावर सालगुडेंनी आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेत तक्रार देताच श्रीकांत नवलेंनी अर्ज पाहिला आणि फ्लॅशबॅक मधे गेले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक लक्ष्मीनारायण शिनगारे करंत आहेत.