02 December 2020

News Flash

मुक्त विद्यापीठ ‘ऑफलाइन’!

दीड महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया रखडली

दीड महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया रखडली

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने नाशिक येथे सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संकेतस्थळ बंद असल्याने मागील दीड महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर लगेच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. ती न झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासकेंद्रांवर हेलपाटे मारावे लागत आहे.

अभ्यास केंद्रामार्फत दिलेल्या तारखेस चौकशी केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुढील तारीख दिली जात आहे.

प्रत्येक वर्षी दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पदवीच्या अभ्यासक्रमासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होते. मोजक्या अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सोडली तर बीए, बी.कॉम, बी.जे, डी.जे व अन्य पदवी व पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश बंद आहेत. काही अभ्यासक्रम बंदही केले आहेत. शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अभ्यासक्रेंद्रावर केंद्र संयोजकांनी जून महिन्यात १ जुलपासून मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशा आशयाचा फलक लावला होता. मात्र ऑनलाइन प्रवेश सुरू झाले नाहीत. २ जुल रोजी पुन्हा १० जुलपासून ऑनलाइन प्रवेश प्रकिया सुरू होईल, असे कळविण्यात आले.

मात्र, त्या दिवशीही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नाही. केंद्र संयोजकांनी पुन्हा १० तारीख खोडून आता २१ जुलपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशा आशयाचा फलक लावला आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 12:07 am

Web Title: open university no response to student about new admission
Next Stories
1 लातूर महापालिकेस ५० कोटींचे उत्पन्न अपेक्षित
2 माजी संचालकाला अटकेपूर्वी ७२ तास नोटीस देण्याचे आदेश
3 ‘एमआयएम’चे परभणीत धरणे आंदोलन
Just Now!
X