सरकार सकारात्मक

औरंगाबाद : मराठवाडय़ात दोन दुधाळ प्रजाती या महत्त्वपूर्ण मानल्या जातात. त्यात लाल कंधारी आणि देवणीचा समावेश आहे. त्यातील देवणीसह देशी दुधाळ जनावरांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी राज्य सरकारकडून  विशेष उपक्रम हाती घेतला जाणार आहे, असे शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

देवणी ही प्रजाती दूध आणि शेतकाम या दोन्हींसाठी उपयोगी असते. बालंक्या आणि वान्नेरा अशा देवणी प्रजातीच्या दोन जाती आहेत. पांढऱ्याशुभ्र त्वचेवर काळ्या रंगाचे डाग उठून दिसणारी गाय आणि बैल मराठवाडय़ात प्रसिद्ध आहेत. उंच आणि बुटक्या दोन्ही बैलांच्या मधली प्रजाती म्हणून देवणीकडे पाहिले जाते. ही गाय केवळ पाच ते सात लिटर दूध देते. देवणी बैल शेतीकामासाठी अधिक चांगला असल्याची धारणा आहे. देवणी प्रजातीच्या संवर्धनासाठी एक संशोधन केंद्रही सुरू करण्यात आले होते. मात्र, त्याचा फारसा काही उपयोग होऊ शकला नाही. उदगीर येथील पशुसंवर्धन केंद्रात मराठवाडय़ातील विविध देशी प्रजातींचे संवर्धन व्हावे, असे काम अपेक्षित होते. त्यात देवणी, लाल कंधारी, उस्मानाबादी शेळी यांचा समावेश होता. मात्र, नंतर देवणी प्रजाती कर्नाटकातील बीदर जिल्ह्य़ामध्ये अधिक प्रमाणात जपली गेली. आजही देवणी येथे जनावरांच्या बाजारात देवणी प्रजातीच्या जनावरांची खरेदी-विक्री मोठय़ा प्रमाणात होते. मात्र, मूळ गावात या जनावरांची संख्या आता कमी झाली आहे. त्यामुळे देवणीच्या संवर्धनासह देशी दुधाळ प्रजातीच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम हाती घेता येईल का, याबाबत मुख्यमंत्र्यांशी शुक्रवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.