News Flash

प्रशासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे पाणी विक्रेते अडचणीत

लातूर शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी केवळ ३० िवधनविहिरींचे अधिग्रहण करून टँकरचालकांनाही जाचक अटी घातल्याबद्दल दोन्ही वर्गात प्रचंड नाराजी असून आम्ही उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल टँकरचालक,

लातूर शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी केवळ ३० िवधनविहिरींचे अधिग्रहण करून टँकरचालकांनाही जाचक अटी घातल्याबद्दल दोन्ही वर्गात प्रचंड नाराजी असून आम्ही उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल टँकरचालक, िवधनविहीर अधिग्रहण केलेले शेतकरी विचारत आहेत.
लातूर शहर व परिसरात किमान १५० ते २०० िवधनविहिरींवरून पाण्याची विक्री होते. गेल्या चार महिन्यांपासून हा उपसा सुरू असल्यामुळे आता शहराला पाणीपुरवठा आजूबाजूच्या २० किलोमीटर अंतरावरील गावातून पाणी उपलब्ध असलेल्या िवधनविहिरीतून होतो. यात प्रामुख्याने साई, अरसखेडा, पाखरसांगवी, हरंगुळ, बुधोडा, पेठ, रायवाडी, भामरी, आदी गावांचा समावेश आहे. शहरात किमान २ हजारांपेक्षा अधिक छोटे-मोठे टँकर नियमित पाणी विकत असतात. टँकरचे भाव वाढत आहेत व िवधनविहिरीचे मालक टँकर भरण्यासाठी पसे वाढवत आहेत. या तक्रारीमुळे महापालिकेने शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील ३० िवधनविहिरींचे अधिग्रहण केले. पकी १२ िवधनविहिरींना पाणी नाही तर १८ िवधनविहिरींवरून टँकरचालकांनी पाणी कसे उपलब्ध करायचे, हा प्रश्न आहे.
प्रशासनाने िवधनविहीर अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यास १२ हजार रुपये महिना देण्याचे निश्चित केले आहे, तर टँकरचालकांनी संबंधित िवधनविहिरीवरून पाणी घेऊन ते केवळ ३५० रुपयांत ६ हजार लिटर पाणी ग्राहकास विकावे, असा फलक टँकरवर लावावा,  असे आदेशित केले आहे. शहरात व शहराबाहेरून ज्या ज्या ठिकाणावरून पाणी लातूरला आणले जाते, अशा सर्व िवधनविहिरी शासनाने अधिग्रहित कराव्यात. केवळ शहरालगतच्या विहिरी अधिग्रहण करून आमची शेती अडचणीत आणल्याचे अधिग्रहण केलेल्या मालकांचे म्हणणे आहे.
सुनील रासुरे या कन्हेरीतील शेतकऱ्याने गावातील सत्तार शेख यांची १३ एकर जमीन वार्षकि अडीच लाख रुपयांवर खोतीने घेतली. त्या शेतीत २ लाख रुपये खर्च करून िवधनविहीर घेतली. त्याला पाणी लागताच ती अधिग्रहण करण्यात आली आहे व महिन्याला आता केवळ १२ हजार रुपये मिळणार आहेत. हा खर्च आता मी कसा काढू, असा रास्त सवाल रासुरेंचा आहे.
अ‍ॅड. आसाराम जगताप यांनी आपल्या शेतात तीन-चार िवधनविहिरींचे पाणी एकत्र करून ते शेततळय़ात साठवले होते. त्या पाण्याला एकाच िवधनविहिरींचे पाणी समजून ते अधिग्रहण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. १२ हजार रुपयात सर्व िवधनविहिरीचे पाणी कसे देता येईल, असे जगताप यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने सरसकट सर्वेक्षण करून िवधनविहिरीचे पाणी अधिग्रहित केले तर ते पाणी लोकांना देता येईल. काही निवडक मंडळींनाच धारेवर धरले तर यातून शहराचा प्रश्न सुटणार नाही.
टँकरचालकांना आपली नोंदणी करून त्यांनी नेमूनदिलेल्या िवधनविहिरीवरूनच पाणी घेण्याचे आदेश दिले आहेत. अंबाजोगाई रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अब्दुल रहीम यांना कन्हेरी येथून पाणी घेण्यास सांगितले आहे. ३६० रुपयांत ६ हजार लिटरचे टँकर ग्राहकांना द्यावयाचे आहे. दिवसभरात १ टँकरही भरत नाही. टँकर भरून बाहेर पडल्यावर एवढय़ा कमी पशात भरपूर पाणी उपलब्ध होत असल्यामुळे टँकर आपल्यालाच द्यावा यासाठी लोक मागे लागतील. तेव्हा आपल्याला मारहाण झाली तर जबाबदार कोण, असा सवाल रहीम यांनी उपस्थित केला. दिवसभरात किमान पाच फेऱ्या केल्या तरच पसे सुटतील अन्यथा रोजगारही निघणार नाही. शहराची पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी बाकी व्यवसाय बंद पडल्यामुळे बँकेकडून कर्ज काढून वाहन घेतले, टँकर घेतले व व्यवसाय सुरू केला. आता प्रशासनाच्या जाचक अटीमुळे आमचा व्यवसाय अडचणीत आल्याचे पाणी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
५०० लिटर पाणी ३० रुपयांत, १ हजार लिटर ६० रुपयांत तर ६ हजार लिटर ३५० रुपयात पाणी विकण्याचा दंडक प्रशासनाने घातला आहे. हे दर न परवडणारे असून यातून आमच्या डिझेलचे पसेही सुटत नसल्याचे पाणी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या सर्व मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले असून सर्व टँकरचालकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यानुसार निर्णय केला तरच आम्ही व्यवसाय करू शकू अन्यथा व्यवसाय बंद ठेवावा लागेल, असे टँकरचालकांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2016 1:20 am

Web Title: water dealers in distress due to administrative policy
टॅग : Latur
Next Stories
1 निधीअभावी घरकूल योजनेचा उडाला बोजवारा
2 जीप पुलाखाली पडल्याने अपघात; ३ ठार १९ जखमी वार्ताहर, उस्मानाबाद जीप पुलाखाली पडल्याने अपघात; ३ ठार १९ जखमी
3 तर्कतीर्थाच्या मुलाच्या आडून बाबा भांड यांचे समर्थन!
Just Now!
X