12 August 2020

News Flash

औरंगाबादेत महिला चोरांची टोळी सक्रिय

दुकाने फोडणारी महिलांची एक टोळी शहरात सक्रिय झाल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत.

दुकाने फोडणारी महिलांची एक टोळी शहरात सक्रिय झाल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत. वेदांतनगर भागातील पाच दुकानांचे शटर उचकटून माल लंपास करणाऱ्या या टोळीत केवळ महिला आहेत. क्रांती चौक भागातील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये या महिला चोर दिसून आल्या आहेत. शहरातील बन्सीलालनगरमध्ये एका फुड मॉलमध्ये शटर उचकटून दोन ३५ ते ४० वयोगटातील दोन महिला आणि चार युवती घुसल्या. त्यांनी ६ हजार २०० रुपये लंपास केले.

गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये या महिला टोळीचा संबंध असेल काय, याचा तपास पोलीस करीत आहेत. शहरातील बन्सीलालनगरात फुड मॉलमधील चोरीच्या तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सहा महिलांची टोळी शटर उचकटून चोरी करत असल्याचे आढळून आले.

या महिला शटर कशापद्धतीने उचकटतात हे तपासून ही टोळी औरंगाबाद शहरातीलच आहे की नाही या अंगाने तपास केला जात असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी सांगितले. शहरात पहिल्यांदाच महिला चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. गेल्या काही दिवसांत ७० हजार रुपयांचा माल या टोळीने पळवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2016 1:45 am

Web Title: women robbers gang active in aurangabad
टॅग Aurangabad
Next Stories
1 मर्यादित साठय़ामुळे जुलैअखेपर्यंत पाण्याचे नियोजन करा- पंकजा मुंडे
2 ‘हजार कोटीच्या पॅकेजनंतरही शेतकरी आत्महत्यांत वाढ’
3 मराठवाडय़ात जलयुक्तची निम्मीच कामे पूर्ण
Just Now!
X