scorecardresearch

शिवरायांच्या पुतळाकामाचे देयक काढण्यासाठी लाच, ग्रामसेवक सापळ्यात

शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime-13
(प्रातिनिधीक फोटो)

औरंगाबाद : शिवाजी महाराजांचा पुतळा आणि पेव्हर ब्लॉकच्या कामाचे देयक काढण्यासाठी धनादेशाद्वारे ३५ हजारांची रक्कम लाच म्हणून काढणाऱ्या ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत सीताराम इंगळे, असे लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

 वैजापूर तालुक्यातील निमगोंदगाव गट ग्रामपंचायतीत वसंत इंगळे (वय ४२) कार्यरत असून तक्रारदाराकडे त्याने सुरुवातीला ६० हजारांची व नंतर ४० हजारांची मागणी केली होती. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने २०२० मध्ये निमगोंदगाव गट ग्रामपंचायतीत शिवाजी महाराजांचा पुतळा व पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम केले होते. त्याचे देयक काढण्यासाठी वसंत इंगळे याने लाच मागितली. त्यासंदर्भातील तक्रार १७ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी यांच्या पथकाने वसंत इंगळे याच्यासाठी सापळा रचला. तक्रारदाराने उपसरपंच व ग्रामसेवक निमगोंदगावच्या नावाने एडीसीसी बँकेच्या शिऊर शाखेचा धनादेश काढला. बँकेतून ३५ हजार रुपयांची रक्कम परस्पर काढून घेताच ग्रामसेवक वसंत इंगळे यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bribe for payment of shivaraya statue work gramsevak arrest akp

ताज्या बातम्या