छत्रपती संभाजीनगर : वकिलीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला पट्ट्याने मारहाण व माहेराहून ५० लाख रुपये आण, अशी मागणी करत छळ केल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यावरून महिलेच्या पतीसह सासरच्या नऊ जणांविरुद्ध बुधवारी रात्री नऊनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विमाननगरीत राहात असलेल्या ३८ वर्षीय वकील महिलेने तक्रार नोंदवली आहे.
फिर्यादीवरून नागेश रामदास बनसोडे, लता रामदास बनसोडे, (सासू), सविता महेंद्र धनेधर, शुभम महेंद्र धनेधर, रत्नमाला सतीश बागुल, रंजित दांडगे, सुनीता रंजित दांडगे (रा. संघर्षनगर, सिडको), संतोष तुळशीराम साळवे (दीर), रुक्मिणीबाई विलास बोर्डे (मावससासू, रा. टाकळी, ता. कन्नड) यांच्याविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार १९ मे २०२४ ते २८ मे २०२५ या कालावधीत वकील असलेल्या विवाहितेला मारझोड, पट्ट्याने मारहाण, शिवीगाळ करण्यात आली आहे.