Chhatrapati Sambhajinagar HSC Result: फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यामिक प्रमाणपत्र – बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाचा निकाल ९२.२४ टक्के लागला असून, यामध्ये मराठवाड्यातील पाच जिल्हे येतात.

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली व बीड यांचा वरील पाच जिल्हयांत समावेश आहे. पाच जिल्हयात मिळून एकूण १ लाख ८१ हजार ७५९ परीक्षार्थींची नोंदणी केली होती. त्यातून १ लाख ७९ हजार ९०४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातून १ लाख ६५ हजार ९६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातून विभागाचा निकाल ९२.२४ टक्के लागला आहे.