औरंगाबाद : औरंगाबादच्या आरोग्य क्षेत्रात ४० वर्षांपासून अत्यंत सचोटीने काम करणारे डॉक्टर अशी ओळख असणारे डॉ. रघुनाथ भास्कर भागवत यांचे  सोमवारी पहाटे निधन झाले. मृत्युसमयी ते ९२ वर्षांचे होते. १९५८ ते १९८४ या कालावधीपर्यंत वैद्यकीय महाविद्यांलयामध्ये प्राध्यापक, औषध वैद्यक शास्त्राचे विभागप्रमुख म्हणून काम करणाऱ्या डॉ. रघुनाथ यांनी मराठवाडय़ात अनेक डॉक्टर घडविले. सामाजिक विषयांवर तसेच राजकीय भाष्य करताना स्पष्ट भूमिका घेणारे डॉक्टर अशी त्यांची ओळख होती. औरंगाबाद येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अजित भागवत यांचे ते वडील होत.   मध्यप्रदेशातील इंदोर येथे २० ऑगस्ट १९३० साली जन्मलेल्या आर. बी. भागवत हे औरंगाबाद शहरातील सार्वजिक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत. अनेकदा ते सायकलवर अशा कार्यक्रमांना येत. १९६१ साली ते पुण्याहून औरंगाबाद येथे आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैद्यकीय महाविद्यालयात काम करताना त्यांच्या सचोटी व प्रामाणिकपणाचे आदर्श आजही सांगितले जातात. त्यांनी बी.जे मेडिकल कॉलेज, पुणे येथील ससून रुग्णालयात तसेच औरंगाबाद नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातही प्राध्यापक म्हणून नोकरी केली. १९९० पासून औरंगाबाद येथील कमल नयन बजाज रुग्णालयात त्यांनी विश्वस्त म्हणूनही काम केले. शालेय व महाविद्यालयीन काळात ते विविध परीक्षांमध्ये तर अव्वल होतेच याशिवाय कुस्तीमध्येही ते अव्वल होते.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ideal teacher r b bhagwat passes away ysh
First published on: 25-01-2022 at 02:31 IST