scorecardresearch

पोलिसांकडून धनत्रयोदशीला पाच कोटी ७० लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

चोरी, गहाळ झालेले सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकी-चारचाकी वाहने, मोबाईल फोन, जनावरे, विहिरीवरील बॅटऱ्या आदी ५ कोटी ७० लाख ९० हजार ९६६ रुपयांचा २४२ प्रकरणांतील मुद्देमाल मूळ तक्रारदारांना परत करण्यात आला.

chhatrapati sambhajinagar, 5 crores 70 lakhs worth of goods
पोलिसांकडून धनत्रयोदशीला पाच कोटी ७० लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत (संग्रहित छायाचित्र)

छत्रपती संभाजीनगर : चोरी, गहाळ झालेले सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकी-चारचाकी वाहने, मोबाईल फोन, जनावरे, विहिरीवरील बॅटऱ्या आदी ५ कोटी ७० लाख ९० हजार ९६६ रुपयांचा २४२ प्रकरणांतील मुद्देमाल मूळ तक्रारदारांना शुक्रवारी ग्रामीण पोलिसांकडून परत करण्यात आला. ग्रामीण अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ मैदानावर पालकमंत्री संदिपान भुमरे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला.

हेही वाचा : “१०-१२ टक्के मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या”, भुजबळांच्या वक्तव्यावर जरांगे-पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले…

pimpri chinchwad municipal corporation, pcmc seized 68 properties, non payment of property tax
पिंपरी महापालिकेकडून चार दिवसांत ६८ मालमत्ता जप्त; सहा मालमत्तांना ठोकले सील
pune drug peddler lalit patil, lalit patil escaped from police custody, pune divisional commissioner saurabh rao
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार; विभागीय आयुक्त राव यांचे आश्वासन
farm water pumps, theft cases in kalwan, farm water pumps in kalwan, 5 detained for theft of farm pumps in nashik
नाशिक : कळवण तालुक्यात शेतीपंप चोरीत वाढ, पाच संशयित ताब्यात
illegal liquor dens, 6 illegal liquor dens destroyed by dhule police
धुळे जिल्ह्यात सहा हातभट्ट्या उद्ध्वस्त, अडीच लाखांचा मुद्देमाल नष्ट

जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात अंतर्गत दाखल गुन्ह्यातील तपासातून हा हस्तगत मुद्देमाल आहे. यामध्ये ४३ चारचाकी वाहने आहेत, ज्यांची किंमत २ कोटी ५९ लाख ४४ हजार ६२० रुपये आहे. एक कोटी ८१ लाख ६६ हजार २०० रुपये किंमतीची १४ अवजड वाहने आहेत. ८ लाख ९९ हजार ३६६ रूपये रोख रक्कम परत करण्यात आली आहे. ४२ लाख ८३ हजारांची ८५ दुचाकी वाहने तर १२ लाख ६७ हजार ७३२ रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने, ४ लाख ५० हजारांची चार तीन चाकी वाहने व २ लाख ९५ हजार ६९७ रुपयांचे २० मोबाईल व इतर मुद्देमालाचा समावेश आहे. यावेळी पोलीस पाटील, विविध गणेश व दुर्गा मंडळांनाही सन्मानित करण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In chhatrapati sambhajinagar 5 crores 70 lakhs worth of goods returned to the original owners by the police on dhanteras css

First published on: 10-11-2023 at 22:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×