scorecardresearch

Premium

“१०-१२ टक्के मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या”, भुजबळांच्या वक्तव्यावर जरांगे-पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले…

“…मग सरकारला जड जाईल”, असा इशाराही जरांगे-पाटलांनी दिला आहे.

manoj jarange on chhagan bhujbal (1)
छगन भुजबळ व मनोज जरांगे पाटील (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठवाड्यात कुणबी नोंदी तपासण्यासाठी मनुष्यबळ कमी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मराठवाड्यात कुणबी नोंदी तपासण्याचे काम वेगाने वाढवण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदी तपासण्याच्या कामात लक्ष द्यावे, अशी विनंती मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

‘५० टक्के आरक्षण आधीच दिलं आहे. यात केंद्र सरकारनं १० टक्के आरक्षण इब्लूएस यांना दिलं आहे. आता १० ते १२ टक्के वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे,’ असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. यावरही जरांगे-पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra fadnavis aaditya thackeray
VIDEO : “वाघनखे शिवाजी महाराजांची की शिवकालीन?” आदित्य ठाकरेंच्या विधानाला फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले…
maratha reservation obc reservation govt trouble
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यावरून टोलवाटोलवी; मराठा आरक्षण आणि ओबीसी प्रश्नावरून सरकार कात्रीत
sambhajiraje chhatrapati
“मी ज्या दिवशी सरकारमध्ये येईन…”, मराठा आरक्षणासाठीच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संभाजीराजेंचं वक्तव्य
SHinde Fadnavis Govt
“महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर…”, मराठा महासंघाचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

हेही वाचा : मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारताच फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की…”

“आम्हाला हक्काचं आरक्षण मिळत आहे”

“मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा. मग, ७५ काय ९० टक्क्यापर्यंत आरक्षण वाढवा. आम्हाला गाजर दाखवण्याचं काम करू नये. आम्हाला हक्काचं आरक्षण मिळत आहे आणि मिळवणारच,” असं प्रत्युत्तर जरांगे-पाटलांनी छगन भुजबळांना दिलं आहे.

“…याचं उत्तर भुजबळांनी दिलं पाहिजे”

मारवाडी, लिंगायत, आदिवासी, मुस्लीम, धनगरमधील काही जाती कुणबीत असलेल्या नोंदी आढळलेल्या आहेत. मग, यांना ओबीसीचा लाभ द्यावा का? असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यानंतर जरांगे-पाटील म्हणाले, “मराठ्यांच्या नोंदी असूनही आम्हाला ओबीसी आरक्षण मिळत नाही. या समाजाचा ओबीसीत समावेश करायचा का नाही? याचं उत्तर भुजबळांनी दिलं पाहिजे. आमचा याला कुठलाही विरोध नाही.”

हेही वाचा : मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा पुन्हा भाजपलाच?

“छगन भुजबळांनी विरोध करणे बंद करावे”

“छगन भुजबळ या समाजाच्या विरोधात जाणार का? मराठ्यांविरोधात खूप आगपाखड करण्याचं काम करत होते. छगन भुजबळांनी विरोध करणे बंद करावे. आम्हीही विरोध करणार नाही,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manoj jarange patil reply chhagan bhujbal over maratha reservation obc reservation ssa

First published on: 10-11-2023 at 10:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×