बिपीन देशपांडे
शाळा, महाविद्यालय स्तरावरील त्या दोघांची मत्री पुढे काही ‘वेगळी’ वागणूक पटत नसल्यामुळे मोडते. पुढे त्यातला मित्र एकतर्फीच मत्रिणीच्या मागे लागतो. प्रतिसाद मिळत नाही म्हणून गरवर्तनाचा मार्ग अवलंबतो. यातून होणारा त्रास वाढल्यानंतर ती आता तक्रारीसाठी थेट फोन करतेय. अशा मुलींच्या साधारण महिनाभरात ४० ते ५० तक्रारी औरंगाबादच्या दामिनी पथकाकडे येत आहेत. मागील काही दिवसांत अशा तक्रारींचा आकडा वाढता आहे.
या तक्रारींच्या अनुषंगाने आणि िहगणघाट, औरंगाबाद, नांदेडमधील छेडछाड, अश्लील चित्रफीत दाखवण्याच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर दामिनी पथकाच्या कामांचा मंगळवारी आढावा घेऊन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आणखी एक शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. औरंगाबादमधील सिडको एन-७ मधील एका शाळेतील शिक्षकाने सातवीतील काही मुलींना अश्लील चित्रफीत दाखवल्याचे प्रकरण ताजे आहे. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध मंगळवारीच सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरणही तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेपर्यंत आणण्यासाठी दामिनी पथकातील महिला पोलीस अधिकाऱ्यांना संबंधित मुलींच्या कुटुंबीयांचे बरेच समुपदेशन करावे लागले.
संबंधित मुलींना विश्वासात घेऊनच त्यांना शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी मानसिक आधार द्यावा लागला. या प्रकरणात एका राजकीय नेत्याशी संबंधित शाळेतील शिक्षक, त्या नेत्याच्या भावाकडून प्रकरण आमच्या स्तरावर सोडवू, तुम्ही तक्रार करू नका, असे सांगत दम भरल्यानंतर पालकांचे मनोधर्य काहीसे खचले होते. मात्र, दामिनी पथकातील महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुलीच्या आईची समजूत घातल्यानंतर अखेर मंगळवारी तक्रार दाखल करण्यात आली. अशा अनेक प्रकरणात दामिनी पथकाने पालकांशी संपर्क साधल्यामुळे आणि त्रास देणाऱ्या मुलांचा बंदोबस्त होऊ लागल्यामुळे तक्रारींसाठी आता मुली पुढे येत असल्याचे दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक वर्षांराणी आजले यांनी सांगितले.
तिच्यासाठी ‘ती’
एखाद्या प्रवासातून रात्रीच्या वेळी औरंगाबादेत उतरल्यानंतर तरुण मुली, महिलांना रिक्षातून घरी जायचे असेल आणि सुरक्षित वाटत नसेल तर त्यांनी फोन करावा, असाही एक उपक्रम पोलीस विभागाकडून ‘तिच्या’साठी ‘ती’ (शी फॉर हर) या माध्यमातून राबवण्यात येत आहे. यासाठी १०० या फोन क्रमांकावर संपर्क साधला तर पोलिसांची यंत्रणा संबंधित मुलगी, तरुणी, महिलेला कुठलेही शुल्क न घेता घरापर्यंत पोहोचवते आहे, असे उपनिरीक्षक वर्षांराणी आजले यांनी सांगितले.
विशाखा समित्यांना बळ
शाळा स्तरावरील छेडछाडीच्या तक्रारीसाठी पूर्वी विशाखा समित्यांची स्थापना तर होत होती; मात्र, बठका, तक्रारींचा आढावा घेतला जात नव्हता. परिणामी या विशाखा समित्या केवळ कागदोपत्रीच होत्या. आता त्यांना कार्यरत करण्यात आले असून चार महिन्यांपासून २९६ शाळांना दिलेल्या भेटीत विशाखा समित्यांच्या कामाला बळ देऊन त्या संदर्भातील आढावा घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.