छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मागणी आंदोलनाचा फटका भाजपला बसल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून उपोषणास बसलेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली. राज्य सरकारकडून ‘ओबीसी’च्या मागण्या ऐकून घेण्यासाठी शिष्टमंडळ पाठविल्यानंतर जरांगे यांनी हे उपोषणच छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून घडत असल्याचा आरोप केला. त्यांना राजकीय जीवनातून संपवू, अशीही भाषा वापरली, त्याला हाके यांनीही उत्तर दिल्याने शुक्रवारचा दिवस हाके विरुद्ध जरांगे असा रंगवला गेला.

पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ तसेच राज्य सरकारने पाठविलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांनी राज्य सरकारकडे हाके यांच्या मागण्या पोहोचवल्या. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीला धक्का कसा लागणार नाही, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी करण्यात येत होती. लोकसभा निवडणुकीतील निकाल पाहता निवडून आलेले सर्व नेते जर मराठाच असतील तर अन्य प्रवर्गाने काय करायचे, असा प्रश्नही गेल्या काही दिवसांपासून विचारला जात होता. राज्य सरकारकडून ओबीसी आंदोलनाची दखल घेतली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्येही एकजूट दाखवून देऊ. पुढील १८ तारखेपर्यंत सरकार काय निर्णय घेत आहे, यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे जरांगे यांनी म्हटले. यामुळे हाके विरुद्ध जरांगे असे चित्र निर्माण झाले आहे.

CSIR UGC NET Exam : सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली, आता कधी होणार ही परीक्षा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंतरवली सराटीमधून ओबीसींची फेरी

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये, या मागणीसाठी आंतरवली सराटी गावातून ओबीसी मंडळींनी फेरी काढून ती वडिगोद्री गावापर्यंत नेली. आंतरवली सराटी व वडीगोद्री ही गावे शेजारीशेजारी आहेत.