हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करण्याची शेतकऱ्यांवर पाळी

गेल्या वर्षी दुष्काळामुळे उत्पादन कमी झाल्यामुळे डाळीचे भाव गगनाला भिडले. यावर्षी पाऊसही चांगला झाला व डाळीला भाव चांगले मिळत असल्यामुळे पेऱ्यात वाढ झाली. आता नवीन मूग बाजारात येत असून सरकारी हमीभावापेक्षा कमी भावाने शेतकऱ्याला बाजारपेठेत मूग विकण्याची पाळी येत आहे. मुगडाळीचा हमीभाव ५ हजार २२५ रुपये प्रतििक्वटल असताना बाजारपेठेत ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये या दराने मूग विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर येत आहे.

temperature drop in mumbai
तापमानात घट; मात्र आर्द्रतेमुळे उष्मा कायम
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?

गतवर्षी मूग डाळीची किंमत १०० रुपये किलो होती व मुगाचा भाव ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये प्रतििक्वटल होता. मुगाच्या भावात व मागणीत झालेल्या वाढीमुळे जगभर डाळीचा पेरा वाढला आहे. म्यानमार, आफ्रिका, केनिया, ऑस्ट्रेलिया या देशांतून मूग डाळीची मोठय़ा प्रमाणावर आयातही करण्यात आली आहे. गतवर्षी आपल्याकडे उत्पादन कमी होते. त्यामुळे विदेशातील शेतकऱ्यांकडून जास्त भावाने मुगाची खरेदी झाली. त्यामुळे विदेशातील शेतकऱ्याला लाभ झाला. यावर्षी आपल्याकडे उत्पादन वाढले. त्यामुळे आपल्या शेतकऱ्याला लाभ होण्याऐवजी तोटा सहन करावा लागत असून हमीभावापेक्षा कमी भावाने मूग विकावा लागतो आहे. सरकार व खासगी व्यापाऱ्यांनी विदेशातून मोठय़ा प्रमाणावर मूग डाळीची आयात केल्यामुळे बाजारपेठेतील भाव वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे.

गतवर्षी तुरीचा भाव १३ हजार ते १४ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला होता व तूर डाळीची किंमत २०० रुपयांपर्यंत पोहोचल्यामुळे संपूर्ण देशातच डाळीच्या भाववाढीवरून टीकेचे वादळ उठले होते. जगभरातच उत्पादन कमी झाले असल्यामुळे सरकारही कोंडीत सापडले होते. शेतकऱ्यांना डाळीचा पेरा वाढवण्याचे आवाहन सरकारने केले. शिवाय बाजारपेठेत भाव चांगला मिळत असल्यामुळे यावर्षी तुरीचा पेरा दीडपट वाढला आहे. देशांतर्गत पेऱ्याबरोबरच विदेशातही डाळवर्गीय पेऱ्यात वाढ झाली आहे.

कॅनडामध्ये मसूर व मटार, ऑस्ट्रेलियात मसूर व हरभरा, आफ्रिकेत तूर व हरभरा याच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या तुरीची बाजारपेठेतील किंमत ६ हजार ५०० रुपये प्रतििक्वटल असून तूर डाळीची किंमत ९० ते ९५ रुपये किलो आहे. तुरीचा हमीभाव ५ हजार ५० रुपये असून डिसेंबर महिन्यात नवीन आवक बाजारपेठेत आल्यानंतर तुरीच्या भावात आणखी घट होण्याची शक्यता आहे. जेमतेम ५ हजार रुपयांच्या आसपास तुरीचा भाव राहील. त्यामुळे शेतकऱ्याच्या अपेक्षेवर पाणी फिरणार आहे. शेतकऱ्यांकडे जेव्हा माल नसतो तेव्हा त्या वाणाला बाजारपेठेत अधिक किंमत असते व शेतकऱ्याचा माल जेव्हा बाजारपेठेत येतो तेव्हा त्याला मातीमोल किमतीने विकावे लागते, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे. सरकारने आतापासूनच यात लक्ष घालण्याची गरज आहे, अशी मागणीही होत आहे. केंद्र सरकारचे प्रत्येक पाऊल शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, असा सरकारचा दावा असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांची जेव्हा बाजारपेठेत कोंडी होते तेव्हा सत्तेत कोणतेही सरकार असले तरी ते शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत नाही, हे दिसून येत आहे.

सरकारने डाळीचे उत्पादन वाढल्यानंतर निर्यातीसाठी बाजारपेठ खुली करावी. डाळ खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची खरेदीची मर्यादा वाढवावी, विदेशातून येणाऱ्या डाळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयातकर लावावा, हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येक बाजारपेठेत खरेदी केंद्र तातडीने सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

बाजारपेठेत कमी भाव

केंद्र सरकारने मुगाचा हमीभाव ५ हजार २२५ रुपये प्रतिक्वटल जाहीर केला असला तरी यापेक्षा कमी भावाने मूग विकला जात आहे. कर्नाटक प्रांतात महाराष्ट्राच्या तुलनेत मुगाची आवक बाजारपेठेत लवकर सुरू होते. शुक्रवारी गदग बाजारपेठेत मुगाची आवक २ हजार ५०० पोती होती व भाव ५ हजार ते ५ हजार ३०० होता. यादगीर आवक १२०० भाव ४७०० ते ५३००, शेडम आवक ४०० भाव ३९०० ते ४०००, रायचूर आवक ३७० भाव ३७०० ते ५०००, लातूर आवक १५ ते २० क्वटल भाव ४ हजार ५०० ते ५ हजार.

सूर्यफुलाचा हमीभाव ३ हजार ९५० रुपये प्रतिक्वटल असताना बाजारपेठेत सध्या ३१०० ते ३२०० रुपये भावाने विकावे लागत आहे. तीच स्थिती करडीची आहे. करडीचा हमीभाव ३ हजार ३०० असताना बाजारपेठेत २ हजार ६०० रुपये प्रतिक्वटल विकावी लागतो आहे.