लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : येथील सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त सय्यद अब्दुल्ला अब्दुल रहेमान कादरी (वय ६९) यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचे दोन दात पडून माकड हाडही तुटले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. ५ मे रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी ८ मे रोजी सातारा पोलीस ठाण्यात सात जणांसह इतर काहींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-सांगली : दोन दिवसाच गटारीतून काढला ५२ टन कचरा

सरदार शब्बीर पटेल, जमील शब्बीर पटेल, आयुब शब्बीर पटेल, शकीर शब्बीर पटेल, शफिक शब्बीर पटेल, जावेद शब्बीर पटेल, युनूस पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांनी शहा नगरात राहणारे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त सय्यद यांना फातेमा फंक्शन हॉलच्या तक्रारी करत असल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे फातेमा फंक्शन हॉलचे मालक व संचालक आहेत.