छत्रपती संभाजीनगर : ऋषीकेश बेद्रेला खंडपीठात जामीन. एक लाख रुपयांच्या जातमुचकल्यावर व तीन महिने बीडसह जालना जिल्ह्यात प्रवेश न करण्याच्या अटीवर न्या. चपळगावकर यांनी जामीन मंजूर केल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. सकपाळ यांनी दिली.

हेही वाचा… Maharashtra Assembly Winter Session 2023 Live : सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक, मुख्यमंत्र्यांची घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेद्रे याच्यावर जालन्यातील आंतरवली येथे मराठा आंदोलनात पोलिसांवर दगडफेक झाल्याप्रकरणात गुन्हा दाखल आहे. पोलीसांवर दगडफेकीच्या ३०७ कलमांतर्गत गुन्ह्यात जमीन मिळाला आहे. दरम्यान ऋषिकेश बेदरे विररुद्ध पिस्टल बाळगल्याप्रकरणीही एक गुन्हा दाखल आहे. त्यावर अद्याप कुठे अपिल करण्यात आले नाही. २४ नोव्हेंबर रोजी बेद्रे याला विविध कलमांतर्गत गुन्ह्यांत अटक करण्यात आली होती.