लोकसत्ता प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: शहराजवळील वळदगाव येथे पती-पत्नी व चार वर्षांची मुलगी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत शुक्रवारी सकाळी आढळून आले. गळफास देऊन आत्महत्या केली, असा अंदाज या घटनेमागे वर्तवण्यात येत आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
घटनास्थळी सातारा ठाण्याचे पोलीस पोहोचले असून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तिघांच्या मृत्यूच्या माहितीला सातारा ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दुजोरा दिला आहे. मृत कुटुंबीय सातारा पोलिस स्टेशन हद्दीत वळदगांवचे उपसरपंच संजय झळके यांच्या भाड्याने दिलेल्या रुममध्ये राहात होते. मोहन प्रताप डांगर (वय २८), पूजा मोहन डांगर (२४) व श्रेया मोहन डांगर (४), अशी मृतांची नावे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.