Car Airbag Price: भारतात दरवर्षी लाखो लोक रस्ते आपला अपघातात जीव गमावतात. यासाठी वाहनांमधील सेफ्टी फीचर्स सातत्याने अपग्रेड केली जात आहेत. यासोबतच शासनाकडून नियमही कडक केले जात आहेत. अलीकडे सर्व कारमध्ये किमान ६ एअरबॅग्ज देण्याचा नियम अनिवार्य करण्यात आला आहे. भारतात धावणाऱ्या काही मोजक्याच कारमध्ये ६ एअरबॅगची सुविधा आहेत. देशातील अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यामध्ये वाहतूक नियमांच्या काटेकोरतेपासून ते वाहनांमधील सुरक्षा वैशिष्ट्ये वाढविण्यावर वाहन उत्पादकांवर भर दिला जात आहे. चला तर मग जाणून घेऊया एअरबॅग म्हणजे काय, त्याची किंमत किती आहे आणि त्याच्याशी संबंधित नियम काय आहेत.

एअरबॅग म्हणजे नेमकं काय? 

एअरबॅग्स कार अपघातादरम्यान होणाऱ्या जोरदार धक्क्यांपासून प्रवाशांची छाती, चेहरा आणि डोके सुरक्षित ठेवण्याचे काम करतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, एअरबॅग्स डॅशबोर्ड, स्टीयरिंग आणि आरशांमध्ये अशी पॅड केलेली भिंत तयार करतात, ज्यामुळे गंभीर दुखापतीचा धोका कमी होतो.

(हे ही वाचा : ‘या’ कंपनीच्या कारमध्ये दोष, ३० हजारांहून अधिक गाड्या मागवल्या परत, तुमची तर नाही? आताच पाहा)

सर्व कार निर्माता कंपन्या संपूर्ण टेस्ट झाल्यानंतर कारमध्ये एअरबॅग देतात. सर्व कारसाठी एअरबॅग वेगवेगळ्या प्रकारे बनविल्या जातात, त्यानंतर कारची क्रॅश चाचणी केली जाते आणि त्यात यशस्वी झाल्यानंतरच एअरबॅग्ज कारमध्ये बसवल्या जातात. भारतात अशा अनेक कार आहेत ज्यात ६ ते ८ एअरबॅग्स उपलब्ध आहेत, परंतु ते फक्त काही वाहनांच्या टॉप मॉडेल्सपुरते मर्यादित आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एअरबॅगची किंमत किती?

सरकारी आकडेवारीनुसार, कारमधील एका एअरबॅगची किंमत सुमारे ८०० रुपये आहे, काही सेन्सर्स आणि तंत्रज्ञानाच्या खर्चासह, त्याची किंमत सुमारे १३,०० रुपये आहे.