मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. दर महिन्याला मारुती सुझुकी लाखो वाहनांची विक्री करते आणि या कंपनीच्या यादीत सर्वाधिक वाहने आहेत. गेल्या महिन्यात मारुती सुझुकी वॅगनआर आणि मारुती सुझुकी स्विफ्ट ही दोन सर्वाधिक विक्री होणारी वाहने आहेत. याशिवाय कंपनीच्या मारुती बलेनो, मारुती अल्टो आणि मारुती ब्रेझा या गाड्यांचीही जोरदार खरेदी करण्यात आली. या कंपनीची तीन कार अशी देखील आहेत, ज्यांच्या विक्रीत कमालीची घट होत आहे आणि ही कंपनीची तीन सर्वात कमी विक्री होणारी मॉडेल्स आहेत. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या कार्स…
मारुती सुझुकीच्या सर्वात कमी विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीत मारुती सियाझ पहिल्या क्रमांकावर आहे. ही एक प्रीमियम सेडान कार आहे. जून महिन्यात सेडानच्या केवळ १,७४४ युनिट्सची विक्री झाली. Maruti Ciaz ची किंमत ९.३० लाख रुपयांपासून सुरू होते आणि १२.४५ लाख रुपयांपर्यंत जाते. यामध्ये तुम्हाला लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत.
(हे ही वाचा : देशातील ‘या’ ८ सीटर सुरक्षित MPV कारसमोर ६ अन् ७ सीटर विसरुन जाल, मोठ्या कुटुंबासाठी परफेक्ट, किंमत…)
मारुती स्प्रेसो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यातील फक्त २,७३१ युनिट्सची विक्री झाली आहे. मारुती एस्प्रेसोची किंमत ४.२६ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ६.१२ लाख रुपयांपर्यंत जाते.
तिसर्या क्रमांकावर मारुती सेलेरियो आहे, ज्यांचे जून महिन्यात केवळ ३५९९ युनिट्स विकले गेले आहेत. मारुती सेलेरियोची किंमत ५.३७ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ७.१४ लाख रुपयांपर्यंत जाते.