महिंद्रा अँड महिंद्रा भारतातील इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये एन्ट्री मारण्यास सज्ज आहे. कंपनी येत्या काही महिन्यांत तीन नवीन इलेक्ट्रिक वाहने आणण्याच्या तयारीत आहे. आनंद महिंद्रा यांनी स्वतः ट्विट करून त्याची पहिली झलक दाखवली आहे. आनंद महिंद्रा यांनी जारी केलेल्या टीझर व्हिडीओमध्ये तीन नवीन इलेक्ट्रिक वाहने दिसत आहेत. त्यातून या तिन्ही गाड्यांचे हेड लॅम्प, टेल लॅम्प आदींची झलक पाहायला मिळते.त्यामुळे कारप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही संपूर्ण नवीन कल्पना करत आहोत आणि या नवीन जगात जन्म घेणारे पहिले मूल अस्वस्थ होत आहे. यासोबतच महिंद्राने आपले बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजनही उघड केले आहे. महिंद्राने सांगितले की, ही तीन इलेक्ट्रिक वाहने जागतिक डिझायनर आणि तज्ञांच्या टीमने बनवली आहेत. टीझरनुसार गाड्या जुलै २०२२ पर्यंत लॉन्च केल्या जातील.

महिंद्रा यांनी आपल्या Mahindra Born Eletric चे ट्विटर हँडल देखील सक्रिय केले आहे. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये, “बॉर्न इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात आपले स्वागत आहे.” असं म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनी आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसऱ्या किंवा चौथ्या तिमाहीत Mahindra XUV300 इलेक्ट्रिक SUV लाँच करू शकते. भारतात, या कारच्या खालच्या लेव्हल वेरिएंटची टाटा नेक्सॉनशी स्पर्धा होईल आणि टॉप स्पेक लेव्हल व्हेरिएंट MG ZS EV शी स्पर्धा करतील. खरेदीदार या कारची आतुरतेने वाट पाहत आहेत.