Buy Maruti Dzire on Loan : सेडान सेगमेंट लिमिटेड रेंज असणारा सेगमेंट आहे ज्यामध्ये मारुती सुझुकी पासून होंडापर्यंतच्या सर्व कारचा समावेश आहे. यामध्ये मारुतीची बेस्ट सेलिंग सेडान मारुती सुझुकी डिझायर कंपनीने आता नवीन अपडेटसह लाँच केली आहे. या सेडान किंमत, मायलेज, फीचर्स सर्वकाही ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.

मारुती डिझायर बेस मॉडल ची किंमत

मारुती डिझायर एलएक्सआय (बेस मॉडलची सुरुवातीची किंमत ६.७९ लाख रुपये आहे जी ऑन रोड असल्यामुळे ७ लाख ६५ हजार ३३८ रुपयांपर्यंत असेल. जर तुम्हाला मारुती डिझायर खरेदी करायची असेल पण बजेट कमी असल्यामुळे खरेदी करू शकत नाही तर टेन्शन घेऊ नका आज आपण फायनान्स प्लानविषयी जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सेडान घरी आणू शकता.

Maruti Dzire: फायनान्स प्लान

ऑनलाइन कार फायनान्स प्लान कॅल्कुलेटरनुसार, जर तुमच्याजवळ एक लाख रुपये असेल तर या पैशांवरून तुम्ही बँकेकडून ६,६५,३३८ रुपयांचे लोन खरेदी करू शकता ज्यावर ९.८ टक्के वार्षिक व्याज घेतले जाईल.

Maruti Dzire: डाउन पेमेंट आणि इएमआय प्लान

मारुती डिझायर बेस मॉडलवर लोन मान्य झाल्यानंतर १ लाख रुपये डाउन पेमेंट जमा केल्यानंतर पुढील पाच वर्षे तुम्हाला दर महिन्याला १४,०७१ रुपये इएमआय भरावे लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारुती डिझायर एलएक्सआयला ऑनलाइन लोन प्लानद्वारे खरेदी करण्यासाठी आपला बँकिंग आणि सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे. जर बँकला बँकिंग किंवा सिबिल स्कोरमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट मिळाला तर बँक लोन अमाउंट आणि व्याज दरामध्ये बदल करू शकतात.