इलेक्ट्रिक टू-व्हीलर वाहन निर्माता एथर एनर्जीने शुक्रवारी भारतीय बाजारात एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल 450S सादर केले आहे.बेंगळुरू-आधारित कंपनीने आपल्या विद्यमान उत्पादन श्रेणीमध्ये अतिरिक्त वैशिष्ट्ये देखील सादर केली आहेत.

Ather Energy ने एका निवेदनात म्हटले आहे की, 450S मधील बॅटरीची क्षमता २.९ kWh आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची कमाल क्षमता ११५ किलोमीटर आहे आणि कमाल वेग ताशी ९० किलोमीटर आहे. एथर एनर्जीचे सह-संस्थापक आणि सीईओ तरुण मेहता म्हणाले, “आमच्या नवीन श्रेणीच्या लाँचमुळे, आमच्याकडे आता ४५० प्लॅटफॉर्मवर तीन वेगवेगळ्या किमतींच्या श्रेणींमध्ये तीन उत्पादने आहेत.

(हे ही वाचा : १३ लाखाच्या कारवर भारी पडली ६.३३ लाखाची ७ सीटर MPV कार; सर्व पडतात फेल? होतेय दणक्यात विक्री )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किंमत

देशांतर्गत बाजारपेठेत एथर एनर्जीच्या तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या आगमनानंतर, त्यांची स्पर्धा ओला एस1 आणि एस1 प्रो, टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक, बजाज चेतक आणि सिंपल वन यांसारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी होईल. दिल्लीत त्याची शोरूम किंमत १.२९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.