ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने १४ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे भारतातील पहिल्या अल्ट्रा-फास्ट चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले. अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन शहरातील सर्व ईव्ही (EV) मालकांसाठी उपलब्ध असेल. चार्ज झोनच्या पार्टनरशिपने विकसित करण्यात आलेल्या या अल्ट्रा-फास्ट चार्जर इलेक्ट्रिक वाहनाला ३६० केडब्ल्यू (360kW) पॉवर वितरित करण्यासाठी एकूण ४५० के डब्ल्यूची (450kW) प्रभावी क्षमता आहे. परफॉर्मन्स आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी ५०० एमपीएस (500 amps) लिक्विड-कूल्ड गनद्वारे (liquid-cooled gun) सक्षमसुद्धा आहे.

अल्ट्रा-फास्ट चार्जिंग स्टेशनमुळे ११४ केडब्ल्यूएच (114 kWh) क्षमतेची ऑडी क्यू८ ५५ (Q8 55) ई-ट्रॉन म्हणजेच भारतातील प्रवासी वाहनावरील सर्वांत मोठी बॅटरी केवळ २६ मिनिटांत २० टक्के ते ८० टक्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. अल्ट्रा-फास्ट चार्जिंग ‘ई-ट्रॉन हब’ पूर्णपणे ग्रीन ऊर्जेद्वारे समर्थित आहे आणि त्याला सोलार रूफसुद्धा आहे; जे ‘ई-ट्रॉन हबला प्रकाश देण्यासह आवश्यक त्या अनेक गोष्टी करण्यास साह्य करते.

ग्राहकांसाठी असणार विशेष सोय :

अल्ट्रा-फास्ट चार्जिंग स्टेशनमध्ये ई-ट्रॉन मालकांसाठी प्रीमियम कॉफी व्हाउचर उपलब्ध आहेत; जे त्यांचे ई-ट्रॉन चार्ज करतात. अल्ट्रा-फास्ट चार्जिंग ‘ई-ट्रॉन हब’मध्ये ई-ट्रॉन मालकांना त्यांची कार चार्ज होत असताना आराम करण्यासाठी एक विश्रामगृहसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. हबमध्ये प्रशिक्षित कर्मचारी असतील; जे आवश्यक ते साह्य देण्यासाठी सहज उपलब्ध असतील. ऑडी ई-ट्रॉन मालक त्यांच्या ‘माय ऑडी कनेक्ट’ ॲपद्वारे अल्ट्रा-फास्ट चार्जिंग ‘ई-ट्रॉन हब’बद्दल माहितीदेखील मिळवू शकतात. तसेच मार्च २०२४ पर्यंत ऑडी ई-ट्रॉनमालकांना मोफत चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. तसेच चार्जर सर्व इलेक्ट्रिक वाहनांसाठी उपलब्ध आहेत.

ऑडी इंडियाने भारतातील ७३ शहरांमध्ये १४० प्लस चार्जर यशस्वीरीत्या स्थापित केले आहेत. त्यामध्ये सर्व ऑडी इंडिया डीलरशिप, कार्यशाळा सुविधा आणि निवडक एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल (SAVWIPL) ग्रुप ब्रॅण्ड डीलरशिपचा समावेश आहे; जे देशातील महामार्गांवर स्थित आहेत. ऑडी इंडियाकडे सध्या भारतात सहा इलेक्ट्रिक कारसह सर्वांत विस्तृत लक्झरी ईव्ही पोर्टफोलिओ आहे. ऑडी क्यू8 50 ई-ट्रॉन, ऑडी क्यू8 55 ई-ट्रॉन, ऑडी क्यू8 स्पोर्टबॅक 50 ई-ट्रॉन, ऑडी क्यू8 स्पोर्टबॅक 55 ई-ट्रॉन, ऑडी ई-ट्रॉन जीटी व ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी आदी इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत.

हेही वाचा…Royal Enfield च्या ‘या’ बाईकसमोर बुलेट, हंटरही विसरुन जाल, बाजारात येतेय नवी बाईक; कधी होणार दाखल?

या खास प्रसंगी ऑडी सेल्स रिजन ओव्हरसीजचे वरिष्ठ संचालक अलेक्झांडर फॉन वाल्डेनबर्ग ड्रेसेल म्हणाले, “ऑडीमध्ये आम्ही इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि मला खूप आनंद होत आहे की, भारतातील ऑडीने ही सेवा स्वीकारली आहे. मुंबईत सर्वांत वेगवान ईव्ही चार्जर सेट करणे ही एक मोठी कामगिरी आहे. मुंबई शहरातील ग्राहकांना या चार्जिंगचा फायदा होईल याची खात्री देतो.“

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग म्हणाले, “ऑडी इंडियाद्वारे भारतातील पहिल्या अल्ट्रा-फास्ट चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन आमच्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टीम विकसित करण्याच्या आमच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अल्ट्रा-फास्ट चार्जिंग ‘ई-ट्रॉन हब’ मुंबईतील वांद्रे -कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मध्यभागी स्थित आहे; जे मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहनमालकांसाठी उपलब्ध आहे.“

चार्ज झोनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकी हरियानी म्हणाले, “आमच्या देशात सुपरचार्जिंग नेटवर्कच्या सहविकासासाठी ऑडी इंडिया आणि चार्ज झोन यांच्यातील सहकार्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. भारतात इलेक्ट्रिक कारच्या वाढीसह, हे ईव्ही वापरकर्त्यांना चांगला अनुभव देण्यासाठी आवश्यक आहे. तसेच ही कल्पना प्रत्यक्षात आणल्याबद्दल मी ऑडीचे आभार मानतो.“

हेही वाचा…मारुतीची सर्वात सुरक्षित SUV २ लाखांनी झाली स्वस्त, दाखल होण्यापूर्वीच मिळाली बंपर बुकींग; आता नेमकी किंमत किती?

या वर्षाच्या सुरुवातीला ऑडी इंडियाने माय ऑडी कनेक्ट ॲपवर (myAudiConnect) ‘चार्ज माय ऑडी’ सादर केले होते. हे एक-स्टॉप सोल्युशन जे ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगबद्दल माहिती प्रदान करते. तसेच ‘चार्ज माय ऑडी’ हा उद्योगातील पहिला उपक्रमात न्युमोसिटी टेक्नॉलॉजी ईएमएसपी (Numocity Technologies eMSP) रोमिंग सोल्युशनद्वारे समर्थित या ॲप्लिकेशनमध्ये सध्या पाच चार्जिंग पार्टनर आहेत– १. अर्गो इव्ही स्मार्ट (Argo EV Smart), २. चार्ज झोन (चार्ज झोन), ३. रेलुक्स इलेक्ट्रिक (Relux Electric), ४. लायन चार्ज (LionCharge) व ५. झेऑन चार्जिंग (Zeon). तसेच सध्या ‘चार्ज माय ऑडी’वर ऑडी ई-ट्रॉन मालकांसाठी १००० प्लस चार्ज पॉइंट उपलब्ध करण्यात आले आहेत आणि पुढील काळात आणखीन उपलब्ध करण्यात येतील, असेसुद्धा कंपनीने सांगितले आहे.