वेगवान, आलिशान कार निर्मितीसाठी लोकप्रिय असलेल्या ऑडी कंपनीने आपल्या Audi q8 e tron मॉडेल्सवरून पर्दा हटवला आहे. क्यू ८ इ ट्रोन, क्यू ८ इ ट्रोन स्पोर्टबॅक, एसक्यू ८ इ ट्रोन आणि एसक्यू ८ इ ट्रोन स्पोर्टबॅक अशा चार मॉडेलमध्ये ही कार उपलब्ध होणार आहे. क्यू ८ ई ट्रोन पूर्वी भारतासह जगात विकल्या जाणाऱ्या ई ट्रोन वाहनाची जागा घेईल. हे चारही मॉडेल्स नव्या डिजाईनसह सादर झाले असून ते नव्या बॅटरी पॅकने सूसज्ज आहे. हा बॅटरी पॅक कारची कामगिरी वाढवेल.

कंपनीने क्यू ८ ई ट्रोनच्या दोन्ही स्टँडर्ड आणि स्पोर्टबॅक व्हर्जनवरून पर्दा हटवला आहे. हे नवीन मॉडेल्स लवकरच भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. लाँच झाल्यानंतर ही कार बीएमडब्ल्यू आयएक्स इलेक्ट्रिक एसयूव्ही, तसेच आगामी मर्सिडिज ईक्यूबीला आव्हान देईल.

(सिटबेल्ट न लावण्याचा मूर्खपणा भोवला, १२० किमीच्या वेगाने चालवली टाटा नेक्सॉन, पाहा काय झाले)

फीचर

कंपनीने कारच्या डिजाईनमध्ये काही बदल केले आहे. कारच्या पुढील भागात नवी ग्रील देण्यात आली आहे. वाहनाच्या टेलगेटवर असलेली लाइटिंग आणि एलईडीबारच्या डिजाईनमध्ये बदल करण्यात आले आहे. क्यू ८ ई ट्रोन ही एसयूव्ही सारखी दिसते, तर ई ट्रोन स्पोर्टबॅक तिच्या झुकलेल्या छतामुळे कुप सारखी दिसते.

इंटेरियर

ऑडीने डॅशबोर्डवर पुनर्वापर केलेले साहित्य वापरले आहे. तीन स्क्रिन देण्यात आल्या आहेत. यामध्ये डिजिटल ड्राइव्ह डिस्प्ले, १० इंचचा इन्फोटेन्मेंट स्क्रिन आणि त्याच्या खाली कंट्रोल फंक्शन असलेले स्क्रिन देण्यात आले आहे.

(सुवर्ण संधी! ह्युडाईच्या ‘या’ वाहनांवर मिळत आहे १ लाखांपर्यंतची सूट, जाणून घ्या ऑफर)

इंजिन

ऑडी क्यू ८ इ ट्रोन ५८२ किमीची रेंज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. कारमध्ये ९५ केडब्ल्यूएचची बॅटरी मिळते. क्यू ८ ई ट्रोन एसयूव्हीमधून ३०० केडब्ल्यूची उर्जा आणि ६६४ एनएमचा टॉर्क मिळतो. ई ट्रोनचे स्पोर्टबॅक व्हर्जनमधून ३७० किलवॉटची उर्ज आणि ९७३ एनएमचा टॉर्क मिलतो आणि सिंगल चार्जमध्ये ५१३ किमीची रेंज मिळते.