भारतात तरुणांमध्ये स्पोर्ट बाइकची सर्वाधिक क्रेझ आहे. ही मागणी पाहता अनेक कंपन्यांच्या स्पोर्ट बाइक बाजारात उपलब्ध आहेत. यात बजाज, टीव्हीएस, हिरो, होंडा आणि सुझुकीसारख्या कंपन्या आघाडीवर आहेत. मात्र अनेकदा गाडी घेताना प्रश्न पडतो की, नेमकी कोणती गाडी खरेदी करायची. असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर देशातील दोन लोकप्रिक स्पोर्ट बाइकची माहिती तुम्हाला देणार आहोत. यासाठी बजाज पल्सर १८० आणि टीव्हीएस अपाचे आरटीआर १८० या दोन बाइक्स आहेत. या दोन गाड्यांच्या किंमती आणि फिचर्सबद्दल माहिती जाणून घ्या.

बजाज पल्सर 180 : बजाज पल्सर 180 त्यांच्या कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या बाईकच्या यादीत येते. ही बाइक वेगवान गती आणि स्पोर्टी डिझाइनसाठी पसंत केली जाते. कंपनीने फक्त एकाच प्रकारात लॉन्च केली आहे. या बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात १७८.६ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन असून जे एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १७.०२ पीएस पॉवर आणि १४.५२ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. मायलेजबाबत, कंपनीचा दावा आहे की ही बजाज पल्सर 180 ही गाडी ४५ किमीचा मायलेज देते. हा मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. बजाज पल्सर 180 ची सुरुवातीची किंमत १.१६ लाख रुपयांपासून सुरू होते. मात्र आरटीओ फी, विमा आणि इतर खर्च जोडल्यानंतर वाढते.

तुमच्या पेट्रोलवरील दुचाकीचं असं करा इलेक्ट्रिकमध्ये रुपांतर; पैशांची होईल बचत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीव्हीएस आपाचे RTR 180 : टीव्हीएस आपाचे आरटीआर 180 ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्पोर्ट्स बाईकच्या यादीत येते. ही बाइक तिच्या स्पोर्टी डिझाइन आणि सुलभ हाताळणीसाठी पसंत केली जाते. कंपनीने तिचा फक्त एक प्रकार बाजारात आणला आहे. बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात १७७.४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे, हे इंजिन १६.७९ पीएस पॉवर आणि १५.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते, यात ५-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. .बाईकच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये, कंपनीने त्याच्या पुढच्या आणि मागील चाकामध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत. यामध्ये सिंगल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम स्थापित करण्यात आली आहे. मायलेजबाबत, TVS चा दावा आहे की ही बाईक ४६ किमीचा मायलेज देते. तसेच मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. त्याची सुरुवातीची किंमत १.१४ लाख रुपये आहे.