बजाज ऑटोची सर्वात लोकप्रिय पल्सर बाईक एक्स-शोरूम किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी केली जाऊ शकते. जर तुम्हालाही ती बाईक मर्यादित बजेटमध्ये खरेदी करायची असेल, तर या ऑफर तुमच्या उपयोगाचे ठरतील. या ऑफरमध्ये तुम्हाला EMI ऑफ्शनसह वॉरंटी देखील मिळेल. चला जाणून घेऊया ऑफरबद्दल…

Crder वेबसाइटवर पोस्ट केलेल्या जाहीरातीत बजाज पल्सर 150DTs-i बाइक 2019 मॉडेल आहे आणि तिने 19,874 किमी अंतर कापले आहे. कंपनीने या बाइकमध्ये 109cc इंजिन दिले आहे. बजाजची ही बाईक तुम्ही ८७ हजार रुपयांना खरेदी करू शकता. Crder कडून या बाइकवर 5 हजार रुपयांमध्ये 6 महिन्यांची कंप्रेसिव्ह वॉरंटी दिली जात आहे.

आणखी वाचा : Komaki Electric या दिवशी नवीन हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार

Quikrbiker वेबसाइटवर पोस्ट केलेल्या जाहीरातीत बजाज पल्सर बाइकचे 2018 मधलं मॉडेल आहे, तुम्ही ही बाईक ९० हजार रुपयांना खरेदी करू शकता. ही बाईक फक्त २ हजार किलोमीटर धावली आहे. Quikrbiker कडून या बाइकवर कोणतीही वॉरंटी आणि EMI पर्याय नाही.

Droom वेबसाइटवर पोस्ट केलेल्या जाहीरातीत बजाज पल्सर 180F बाईक, ही बाईक 2019 चे मॉडेल आहे, ही बाईक फक्त ८५,६९५ रुपयांना खरेदी करता येईल, ही बाईक फक्त १९ हजार किलोमीटर धावली आहे. त्याचबरोबर या बाईकवर Droom वरून EMI चा पर्याय दिला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाईक 24 वर दिलेल्या जाहीरातीत बजाज पल्सर 150 बाईक केवळ ५१ हजार रुपयांना खरेदी केली जाऊ शकते, ही बाईक 2018 चे मॉडेल आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बजाज पल्सर 150 बाईक 42,026 किमी धावली आहे आणि आरसी तसंच विमा आहे.