टू व्हीलर सेक्टरच्या बाईक सेगमेंटमध्ये स्पोर्ट्स बाईक्सची मोठी रेंज आहे ज्यामध्ये १२५ cc ते १००० cc पर्यंत इंजिन क्षमता असलेल्या बाईक्स सहज उपलब्ध आहेत. बजाज, टीव्हीएस, हिरो, होंडा, सुझुकी आणि केटीएम यांसारख्या कंपन्यांच्या या सेगमेंटमध्ये सर्वाधिक बाईक्स आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हालाही मिड-रेंज स्पोर्ट्स बाईक खरेदी करायची असेल, तर या सेगमेंटच्या दोन लोकप्रिय बाईक्सचे तपशील इथे जाणून घ्या, ज्या त्यांच्या किंमतीव्यतिरिक्त त्यांच्या डिझाईन, स्टाईल आणि मायलेजसाठी पसंत केल्या आहेत.

या स्पोर्ट्स बाईकच्या तुलनेमध्ये आमच्याकडे बजाज पल्सर N160 आणि TVS Apache RTR 160 4V आहेत ज्यात तुम्हाला दोन्ही किंमती, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचे संपूर्ण तपशील माहित असतील तर तुम्ही तुमच्यासाठी योग्य ती निवडू शकाल.

Bajaj Pulsar N 160
बजाज पल्सर N160 ही आकर्षक डिझाईन आणि वेगवान बाईक आहे जी कंपनीने अलीकडेच लॉंच केली आहे. कंपनीने या बाईकचे दोन व्हेरिएंट बाजारात लॉंच केले आहेत.

बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात १६४.८२ cc चे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन १६ PS पॉवर आणि १४.६५ Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स जोडला आहे.

मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक ४५ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्याच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत, ज्यामध्ये ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम स्थापित केले आहे. यासोबत अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहेत.

Bajaj Pulsar N160 ची सुरुवातीची किंमत १.२३ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप व्हेरिएंटवर १.२८ लाखांपर्यंत जाते.

आणखी वाचा : फक्त १५ हजारात खरेदी करा Hero HF Deluxe, ८३ kmpl मायलेज, वाचा ऑफर

TVS Apache RTR 160 4V
TVS Apache RTR 160 4V त्याच्या सेगमेंटसह त्याच्या कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाईक्समध्ये गणले जाते. कंपनीने आतापर्यंत या बाईकचे चार व्हेरिएंट बाजारात आणले आहेत.

इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात १६४.९ cc चे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन १९.२१ PS पॉवर आणि १४.२ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे.

मायलेजबद्दल बोलताना कंपनीचा दावा आहे की ही TVS Apache RTR 160 बाईक ५५.४७ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्याच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे, ज्यामध्ये सिंगल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम जोडण्यात आली आहे.

TVS Apache RTR 160 4V ची सुरुवातीची किंमत १.२२ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते जी टॉप व्हेरिएंटमध्ये १.४५ लाख रुपयांपर्यंत जाते.

More Stories onऑटोAuto
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj pulsar n160 vs tvs apache rtr160 4v which is better sports bike in price style and mileage read report prp
First published on: 21-08-2022 at 20:52 IST