कार क्षेत्रात हॅचबॅक सेगमेंटची मागणी सर्वाधिक आहे, ज्यामुळे या सेगमेंटमध्ये येणाऱ्या कार किमती आणि मायलेजच्या दृष्टीने किफायतशीर असतील. पण यासोबतच या सेगमेंटमध्ये काही प्रीमियम कार आहेत, ज्या त्यांच्या किंमती आणि मायलेज व्यतिरिक्त त्यांच्या फीचर्ससाठी आणि डिझाईनसाठी पसंत केल्या जातात. ज्यामध्ये आम्ही या सेगमेंटमधील लोकप्रिय कार Hyundai Motors ची Hyundai i20 बद्दल बोलत आहोत, जी एक प्रीमियम हॅचबॅक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Hyundai i20 Magna बेस मॉडेलची किंमत

किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Hyundai i20 Magna च्या बेस मॉडेलची किंमत ७,०७,४०० रुपये एक्स-शोरूम, दिल्ली आहे आणि ऑन-रोड ७,९५,७०७ रुपये आहे. या ऑन-रोड किमतीनुसार, ही कार रोखीने खरेदी करण्यासाठी तुम्हाला सर्व मिळून ७.९५ लाख रुपये खर्च करावे लागतील.

पण इथे आम्ही तुम्हाला अशा ऑफर्सबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्ही ही कार डाउन पेमेंट आणि मासिक EMI प्लॅनद्वारे फक्त ५० हजार रुपये भरून खरेदी करु शकता. चला तर जाणून घेऊया फायनान्स प्लॅन.

(हे ही वाचा : Nissanची दमदार SUV लवकरच होणार लाँच; फीचर आणि लूक एकदम जबरदस्त, फॉर्च्युनरला देणार टक्कर )

Hyundai i20 फायनान्स प्लॅन

Hyundai i20 चे बेस मॉडेल खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट ५०,००० रुपये असल्यास, ऑनलाइन फायनान्स प्लॅनचे तपशील देणाऱ्या डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, बँक या कारसाठी ७,४५,७०७ रुपयांपर्यंत कर्ज देऊ शकते.

Hyundai i20 बेस मॉडेलवर कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला या कारसाठी ५०,००० रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल. या प्रक्रियेनंतर, कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने निर्धारित केलेल्या ५ वर्षांच्या कालावधीत प्रत्येक महिन्याला १५,७७१ रुपयांची मासिक ईएमआय जमा करावी लागेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Base model of hyundai i20 by paying 50 thousand know how much monthly emi will have to be paid in 5 years pdb
First published on: 13-01-2023 at 19:17 IST