अलीकडेच महिंद्राने भारतीय बाजारात तिची सर्वात परवडणारी SUV XUV 3XO लाँच केली आहे. कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत ७.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे. जर तुम्हाला पूर्ण रक्कम भरून ही SUV खरेदी करायची नसेल, तर तुम्ही ती फायनान्स प्लॅनद्वारे करू शकता. त्यामुळे तुम्ही कर्जावर या SUV चे बेस मॉडेल खरेदी केल्यास तुम्हाला किती मासिक हप्ता भरावा लागेल ते जाणून घ्या. Mahindra XUV 3XO च्या फायनान्स पर्यायांबद्दल जाणून घेण्यापूर्वी, कंपनी या SUV मध्ये काय ऑफर करत आहे आणि बाजारात उपलब्ध असलेल्या इतर SUV च्या तुलनेत त्यात काय खास आहे ते जाणून घेऊया..

किंमत किती आहे?

महिंद्राच्या बेस मॉडेल MX1 1.2 L TCMPFi व्हेरियंटची किंमत ७ लाख ४९ हजार २०० रुपये आहे तर ऑन-रोड किंमत ८ लाख ४१ हजार ७५० रुपयांवर पोहोचते. नवीन Mahindra XUV 3XO SUV च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, यात इंटिग्रेटेड डेटाइम रनिंग लाइट्स (DRL), मोठ्या सेंट्रल एअर इनटेकसह अद्ययावत बंपर आणि अधिक टोकदार नाक, नवीन डिझाइन केलेले ग्रिलसह सर्व-एलईडी हेडलाइट्स मिळतात. तर मागील बाजूस बंपर-इंटिग्रेटेड रजिस्ट्रेशन प्लेट, फुल-वाइड एलईडी लाइट बार आणि स्लीकर सी-आकाराचे टेललॅम्पसह अपडेटेड टेलगेट डिझाइन मिळते.

(हे ही वाचा : मारुती, टाटा अन् ह्युंदाईला फुटला घाम, महिंद्राची ५ सीटर कार आता ७ सीटर पर्यायात पाच रंगात देशात दाखल, किंमत…)

वैशिष्ट्ये

महिंद्रामधील वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर अनेक नवीन वैशिष्ट्यांमध्ये १०.२५-इंच फुल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, मागील एसी व्हेंट्स आणि बरेच काही समाविष्ट आहे. सुरक्षिततेच्या बाबतीतही, यात लेव्हल 2 ADAS प्रदान केले गेले आहे जे अगदी अत्याधुनिक आहे आणि यामुळे सुरक्षितता वाढली आहे. याशिवाय यात १.२ लिटर क्षमतेच्या डिझेल इंजिनचा पर्याय आहे.

महिंद्रा XUV 3XO फायनान्स प्लॅन

जर तुम्ही Mahindra XUV 3XO चे बेस मॉडेल रोखीने खरेदी केले तर तुमच्याकडे ८.४२ लाख रुपये असणे आवश्यक आहे. पण जर तुम्हाला काही डाउन पेमेंट करून कर्जावर खरेदी करायची असेल तर आम्ही तुम्हाला त्याच्या फायनान्स पर्यायाबद्दल सांगत आहोत. ऑनलाइन फायनान्स प्लॅननुसार, जर तुम्ही या SUV साठी १,५०,००० रुपये डाउन पेमेंट केले तर तुम्हाला उर्वरित ६,९१,७५० रुपयांसाठी कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्ही कर्जाचा कालावधी ५ वर्षांसाठी ठेवला आणि बँकेचा वार्षिक व्याज दर ९.५० टक्के असेल, तर मासिक EMI १४,३६० रुपये असेल. म्हणजेच तुम्हाला सर्व हप्त्यांसह एकूण ८,६१,६०० रुपये बँकेत भरावे लागतील.